Goa Crime: 43 कोटींच्या मोठ्या कारवाईनंतर 11 कोटींचे ड्रग्स जप्त; टॅक्सी आणि अपार्टमेंटच्या आड शिवोलीत सुरु होता काळाबाजार

Siolim Drug Racket Bust: अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने शिवोली येथे ११.०७ कोटींचा एलएसडी द्रव्यपदार्थाची विक्री करण्यास आलेला संशयित महम्मद समीर (केरळ) याला अटक केली
latest Goa crime update
latest Goa crime updateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आठवड्यापूर्वी राज्यात ड्रग्जप्रकरणी सर्वाधिक मोठी कारवाई क्राईम ब्रँचने केल्यानंतर अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने शिवोली येथे ११.०७ कोटींचा एलएसडी द्रव्यपदार्थाची विक्री करण्यास आलेला संशयित महम्मद समीर (केरळ) याला अटक केली असून या कारवाईमुळे गोव्यातील ड्रग्स माफियांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संशयित महम्मद समीर हा गेल्या पाच वर्षांपासून गोव्यात राहतोय. आश्चर्याची बाब म्हणजे तो केवळ ड्रग्सच्या धंद्यातच नव्हे, तर अपार्टमेंट भाड्याने देण्याचा आणि टॅक्सी चालवण्याचा व्यवसाय देखील करत होता. या व्यवसायाच्या आड तो ड्रग्सचा काळाबाजार चालवत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मोहम्मदच्या हालचालींवर एएनसीची बऱ्याच दिवसांपासून नजर होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला उत्तर गोव्यातील शिवोली परिसरात रंगेहाथ पकडण्यात आले.

latest Goa crime update
Goa Crime: अपहरण करून अल्पवयीन मुलीवर अत्‍याचार; आरोपीला 10 वर्षांची कैद व एक लाखांचा दंड

त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या एलएसडीची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत कोट्यवधी रुपये आहे.

या कारवाईमुळे गोव्यातील आणखीन ड्रग्स नेटवर्कचे मोठे कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे. मोहम्मदचे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणाशी संबंध आहेत, याचा तपास एएनसी करत आहे. त्याच्या भाड्याच्या अपार्टमेंट आणि टॅक्सी व्यवसायाचा वापर ड्रग्सच्या वाहतुकीसाठी किंवा लपवण्यासाठी केला जात होता का, याचीही कसून चौकशी केली जात आहे. गोव्यातील ड्रग्सच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर एएनसीची ही कारवाई महत्त्वाची ठरतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com