Goa Drugs Case: 43 कोटींच्या कोकेनसाठी रक्कम आली कुठून? संशयितांना कोठडी वाढीसाठी करणार न्यायालयात उभे

Goa Cocaine Case: गोव्यात कधी नव्हे तो सर्वाधिक ड्रग्ज जप्त करताना क्राईम ब्रँचने संशयित रेश्‍मा वाडेकर व तिचा पती मंगेश वाडेकर तसेच संशयित निबू व्हिन्सेंट या तिघांना अटक केली होती.
Sadabogda Residents Stayed Silent on Wadekar Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गेल्या आठवड्यात क्राईम ब्रँचने कारवाई करत सुमारे ४३ कोटींच्या कोकेन ड्रग्जप्रकरणी अटक केलेल्या तिघा संशयितांची पोलिस कोठडी आज संपल्याने उद्या (२१ एप्रिल) कोठडी वाढवून घेण्यासाठी उभे केले जाणार आहे.

मुख्य सूत्रधार संशयित रेश्‍मा वाडेकर हिने या ड्रग्जचा स्रोत चौकशीत अजूनही उघड केलेला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी कोठडी वाढवण्याची विनंती न्यायालयाला केली जाणार आहे, अशी माहिती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गोव्यात कधी नव्हे तो सर्वाधिक ड्रग्ज जप्त करताना क्राईम ब्रँचने संशयित रेश्‍मा वाडेकर व तिचा पती मंगेश वाडेकर तसेच संशयित निबू व्हिन्सेंट या तिघांना अटक केली होती. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत सुमारे ४३ कोटी रुपये होती.

Sadabogda Residents Stayed Silent on Wadekar Drug Case
Goa Drugs Case: कोकेन प्रकरणातील 'दाम्पत्याची' चौकशी करा! संशयास्पद हालचालींच्या होत्या तक्रारी; मुरगाव नगरसेवकांची मागणी

त्यामुळे संशयित रेश्‍मा हिने त्याची रक्कम कोठून आणली तसेच त्यामागे कोणी गोव्याबाहेरील ड्रग्ज माफिया पाठीशी आहेत का, याचा शोध घेण्यात येत आहे. तिने कोकेनची चॉकलेट्स व कॉफीची पॅकेट्स कारवाई होण्यापूर्वी आणखी कोणाला विकली होती का याची माहिती पोलिस जमा करत आहेत. निबू व्हिन्सेंट याचा वाडेकर जोडप्याने ड्रग्ज पुरवठादार म्हणून वापर केला जात होता, असे चौकशीत समोर आले आहे.

Sadabogda Residents Stayed Silent on Wadekar Drug Case
Goa Drug Case: गोवा पोलिसांचा दणका! वागातोर येथे 2.20 लाखांच्या ड्रग्जसह मुंबईतील तरुणाला अटक

वकिलांवर लैंगिक शोषणाचे कथित आरोप

दरम्यान, संशयित रेश्‍मा वाडेकर हिने चौकशीदरम्यान तिला कायदेशीर मदत करणाऱ्या दोघा वकिलांवर लैंगिक शोषणाचे कथित आरोप केले आहेत. याप्रकरणी क्राईम ब्रँचने तिची जबानी नोंदवून पुढील कारवाईसाठी दक्षिण गोवा पोलिस अधिक्षकांकडे पाठवली आहे. त्यामुळे हे वकील अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ते संशयिताच्या संपर्कात होते, त्यामुळे त्यांची कोकेन ड्रग्ज प्रकरणामध्येही चौकशी होऊ शकते, अशी माहिती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्याने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Drug Case
Liberian Drug Accused Goa
236 Grams Ganja Charas Goa
Virendra Singh Baisoya Drug Mafia Deported Dubai
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com