

मोरजी: गोव्यातील रेती, चिरे व खडी वाहतूक करणाऱ्या ट्रक व्यावसायिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित समस्यांवर अखेर सकारात्मक हालचाल सुरू झाली आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ-मालवण मतदारसंघाचे विद्यमान आमदार नीलेश राणे यांनी या प्रश्नावर आठ दिवसांत संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. ही बैठक पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या पुढाकाराने त्यांच्या धारगळ येथील निवासस्थानी पार पडली.
बैठकीत गोवा-सिंधुदुर्ग दरम्यान रेती, चिरे व खडी वाहतुकीवर आकारले जाणारे वाढीव दर, विविध शुल्क आणि त्यामुळे व्यवसाय तोट्यात जात असल्याचा मुद्दा ट्रक व्यवसायिकांनी मांडला. अनेक ट्रकमालकांनी खर्च वाढल्याने व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याची व्यथा व्यक्त केली.
ट्रक व्यावसायिकांच्या प्रमुख मागण्या
रेती, चिरे व खडी वाहतुकीवरील वाढीव दर कमी करावेत
अतिरिक्त शुल्क व अडथळे रद्द करावेत
गोवा-सिंधुदुर्गदरम्यान समान, सुलभ वाहतूक धोरण लागू करावे
व्यवसाय टिकवण्यासाठी आर्थिक दिलासा द्यावा
दोन्ही राज्यांतील व्यावसायिकांचे हित जपले जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही. गोवा व सिंधुदुर्ग यांचे नाते अतूट असून ते अधिक दृढ करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जाईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.
- नीलेश राणे, आमदार (कुडाळ-मालवण मतदारसंघ)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.