NCP Goa: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, गोव्यात स्वबळावर लढणार निवडणूक; राष्ट्रीय नेता 3 दिवसीय दौऱ्यावर

Ajit Pawar NCP Goa : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने गोव्यात चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्याने पहिल्यांदाच गोव्याला भेट दिली आहे.
Ajit Pawar NCP
Ajit Pawar NCP | DCM MaharashtraDainik Gomantak
Published on
Updated on

Ajit Pawar's NCP to Contest Goa Elections: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गोव्यात निवडणूक लढण्यासाठी चाचपणी सुरु केल्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील गोव्यात निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी गोव्यात स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. याबाबत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय नेते ब्रीजमोहन श्रीवास्तव तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय महामंत्री ब्रीजमोहन श्रीवास्तव गोव्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. "तीन दिवसांच्या गोवा राज्याच्या दौऱ्यात मी विविध लोकांच्या भेटी घेणार आहे. यात राज्यातील अनेक मोठे चेहरे देखील आहेत. या लोकांचे मत जाणून घेण्यासाठीच मी येथे आलोय. राष्ट्रवादी गोव्यात कोणत्याही युतीशिवाय स्वबळावर निवडणूक लढवेल," असे नेते ब्रीजमोहन श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar NCP
OLA Uber In Goa: गोव्यात ओला, उबेर सेवा येणार नाही; मुख्यमंत्री सावंत यांची टॅक्सी प्रश्नावर महत्वाची माहिती

मार्च महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गोव्यात बेकायदा गोष्टीविरोधात जनआंदोलन उभारून वातावरण निर्मिती केल्यानंतर निवडणुकीबाबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. माजी खासदार गजानन कीर्तीकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नेत्यांची बैठक यावेळी पार पडली होती. यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने गोव्यात चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्याने पहिल्यांदाच गोव्याला भेट दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोव्यातील नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत किती कार्यकर्ते आणि कोणकोणते नेते उभे राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच, महाराष्ट्रात युतीसोबत असलेल्या राष्ट्रवादीने गोव्यात स्वबळाचा नारा दिल्याने, शिंदेंची शिवसेना देखील स्वबळाचा नारा देणारा का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Ajit Pawar NCP
Sindhudurg: सिंधुदुर्गमध्ये आढळला दुर्मिळ काळतोंड्या साप, Viral Video

सध्या राज्यात भाजप आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे युती सरकार अस्तित्वात आहे. काँग्रेसच्या आठ आमदारांनी पक्षांतर करुन भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्यात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप मगोला सोबत घेण्याची शक्यात धुसर झालीय. मुख्यमंत्री सावंत यांनी देखील याबाबत वेळोवेळी तसे संकेत दिलेत.

२०२७ मध्ये भाजप स्वबळाचा नारा देण्याची दाट शक्यता आहे. पण, राज्यातील प्रादेशिक पक्ष तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सर्व पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास आगामी निवडणूक अधिक चुरशीची आणि रंगतदार होणार यात शंका नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com