Serendipity Arts Festival: अवघ्या काही तासांत 'सेरेंडिपिटी'चा पडदा उघडणार; अनोख्या कला अविष्कारासाठी गोवा सज्ज

Curtain raiser: Serendipity Arts Festival to be held in Goa- या महोत्सवात प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन हेही आपला सहभाग दर्शवणार आहेत.
Serendipity Arts Festival
Serendipity Arts FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

Curtain raiser: Serendipity Arts Festival to be held in Goa पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात दरवर्षी 15 डिसेंबरला विविध कलांचे प्रदर्शन करणाऱ्या सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलला सुरुवात होते. अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलमधून यंदा गोमंतकीयांना विविध कलाकृतींचा आस्वाद घेता येणार आहे.

पणजी शहरात होणाऱ्या सेरेंडिपीटी कला महोत्सवाच्या 6 व्या आवृत्तीच्या 128 प्रकल्प प्रदर्शित होणार आहेत. नृत्य, व्हिज्युअल आर्ट्स, संगीत, पाककला कला, रंगमंच आणि क्राफ्ट या सहा व्यापक शाखांमध्ये विभागल्या गेलेल्या या महोत्सवात प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन हेही आपला सहभाग दर्शवणार आहेत.

फेस्टिव्हलमध्ये या वर्षी सहा विषयांमध्ये 10 तज्ञ क्युरेटर्स आहेत. भारतातील महान शास्त्रीय तबला वादक आणि ग्रॅमी पुरस्कार नामांकित विक्रम घोष यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार आणि पर्यावरणवादी रिकी केज सोबत गेल्या आवृत्तीत संगीत विभागाचे नियोजन केले होते.

यंदाही ते संगीताच्या विविध शैली आणि प्रकार याद्वारे विविध सांस्कृतिक-सामाजिक संकल्पनांना संबोधित करणाऱ्या मैफली महोत्सवात सादर करणार आहेत.

बेंगळुर मधील नृत्यारुत्याच्या प्रमुख आणि एक अग्रगण्य भारतीय शास्त्रीय नृत्यांगना गीता चंद्रन आणि मयुरी उपाध्या शास्त्रीय, प्रायोगिक आणि समकालीन नृत्य सादरीकरणे या महोत्सवासाठी निवडतील.

महोत्सवात नृत्य कार्यशाळांचे आयोजन देखील त्या करणार आहेत. तसेच नवी दिल्ली येथील विद्या शिवदास आणि स्पेस स्टुडिओ, बडोदा येथील कार्यक्रम संचालक वीरांगनाकुमारी सोलंकी; हस्तकला विभागासाठी बेंगळुरू येथील डिझायनर, शिक्षक आणि उद्योजक संदीप कुमार संगारू आणि कला इतिहासकार अंजना सोमनी हे क्युरेटर म्हणून काम पाहणार आहे.

Serendipity Arts Festival
Goa Accident Case: मडगाव-कुंकळ्ळी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

गोव्याच्या रॅप सीनने सर्वकालीन उच्चांक गाठला असून, संगीत शाखेच्या अंतर्गत प्रख्यात प्रकल्पांपैकी एक म्हणजे रासा आणि रॅप आहे. यात भारतातील रॅपर्स विविध भाषांमध्ये परफॉर्म करणार असून उस्ताद झाकीर हुसेन हे ‘अन इव्हनिंग ऑफ सेरेंडिपिटी - विथ झाकीर हुसेन’ मध्ये सादरीकरण करणार आहेत, शास्त्रीय संगीताच्या जाणकारांसाठी आवर्जून भेट द्यावी.

'मणिपुरी रास' मधील मणिपूरमधील रास लीला आणि साहित्यप्रेमी डॉन क्विक्सोट या क्लासिक कादंबरीवरील भारतीय शास्त्रीय संगीत-नृत्य-थिएटर पाहायला मिळणार आहे.

बांबू आणि कठपुतळी तसेच क्राफ्टेड एक्स्प्रेशन्समध्ये भारतीय परफॉर्मिंग आर्ट्समधील मूर्त परंपरा, अभ्यागत कठपुतळी आणि पोशाख बनवण्यामागील कारागिरी पाहता येणार आहे.

Serendipity Arts Festival
Goa Traffic Issue: वाहतुकीत अडकली रुग्णवाहिका

‘पाकघर कार्यशाळा: गोवन कुकिंग’ यामधील फेनी टेस्टिंग आणि गोवन फूड मध्ये गोव्याच्या हेरिटेज ड्रिंकची म्हणजेच फेणीची चव चाखता येणार आहे. गोव्याच्या स्वतःच्या ‘फेनी डॉटर’ हॅन्सेल वाझने स्थापन केलेल्या फेनी डिस्टिलरीद्वारे कारागीर फेणी बनवण्याची प्रक्रिया समजून घेत अभ्यागत स्वादिष्ट फेनीचा आस्वाद घेता येणार आहे.

Serendipity Arts Festival
Goa School: एक दिवस ‘विनादप्तर शाळा’; ‘सीटीएन’ची अनोखी संकल्पना

'या' ठिकाणी होतील कार्यक्रम:-

13 ठिकाणी आयोजित केले जाईल - आर्ट पार्क (13 कार्यक्रम), अबकारी इमारत (5 कार्यक्रम), जुने GMC कॉम्प्लेक्स (50 कार्यक्रम), ESG कॉम्प्लेक्स (9 कार्यक्रम), सांता मोनिका जेट्टी (1 कार्यक्रम), जुने PWD कॉम्प्लेक्स (5 इव्हेंट), मल्टी लेव्हल पार्किंग (2 इव्हेंट), सांबा स्क्वेअर, नागल्ली हिल्स ग्राउंडवरील एरिना (13 इव्हेंट), प्रोमेनेड, दीनानाथ मंगेशकर कला मंदिर (8 कार्यक्रम), आझाद मैदान (1 कार्यक्रम) आणि पणजी ओलांडून ( 1 कार्यक्रम).

सेरेंडिपिटी आर्ट्स फाउंडेशन आणि सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलच्या संचालक स्मृती राजगढिया म्हणाल्या, विशेष गरजा असलेल्या लोकांसाठी आम्ही रॅम्प, ब्रेल आर्टवर्क, ब्रेल मार्गदर्शक, सांकेतिक भाषा तज्ञ, ऑन-ग्राउंड ऍक्सेसिबिलिटी टीम यासारख्या सुविधा महोत्सवात पुरविल्या जाणार असून आम्ही शक्य तितक्या जागा व्हीलचेअर प्रवेश करण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

या कार्यक्रमासाठी तुम्ही https://www.serendipityartsfestival.com/ वर नोंदणी करू शकता अशी माहिती देखील त्यांनी दिलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com