Goa Traffic Issue: वाहतुकीत अडकली रुग्णवाहिका

Goa Traffic Issue: कुडचडेतील प्रकार : मलनिस्सारण वाहिनीच्या कामामुळे अडथळा
Goa Traffic Issue:
Goa Traffic Issue: Dainik Gomantak

Goa Traffic Issue: कुडचडे मतदारसंघात गेल्या दीड वर्षापासून विकासकामे सुरू असल्याने यासाठी जागोजागी रस्ते खोदून ठेवले आहेत. केपे ते कुडचडे मार्गावरील माड-बाणसाय येथे मुख्य रस्त्यावर मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू आहे.

Goa Traffic Issue:
Waste Project Issue: वैद्यनगर येथे कचरा प्रकल्प नको

तरीही या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक न केल्याने वारंवार वाहतूक खोळंबून पडते. मंगळवारी (ता.१२) सायंकाळी या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिका अडकली.

कुडचडे मतदारसंघातील अंतर्गत तसेच मुख्य रस्ते खोदून ठेवल्याने गेल्या दीड वर्षांपासून लोकांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या होडर पूल रहदारीसाठी बंद ठेवल्याने चांदरमार्गे कुडचडेला होणारी वाहतूक शेल्डेमार्गे वाळविल्याने केपे ते कुडचडे मार्गावरील वाहतूक वाढली आहे.

तसेच बाणसाय येथे मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू असल्याने वारंवार वाहतूक खोळंबून पडते. मात्र, ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक न केल्याने लोक मिळेल तशी वाहने चालवतात.

कुडचडे मतदारसंघातील रस्त्यांची स्थिती माहीत असूनही कुडचडे वाहतूक पोलिस निरीक्षक या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी नेमणूक न करता सर्व पोलिसांना लोकांना चलन देण्यासाठी जुंपत असल्याचे लोकांनी सांगितले. कुडचडे बाजारातील रस्त्यावरून वाहन चालविणे अत्यंत कठीण झाले आहे व याची जाणीव असूनही चलन देऊन पोलिस लोकांची आणखी सतावणूक करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com