Goa Accident Case: दक्षिण गोव्यातील मडगाव ते कुंकळ्ळी हा रस्ता जणू मृत्यूमार्ग बनला आहे. गेल्या दहा महिन्यांत या रस्त्यावर तब्बल 114 अपघात झाले आहेत. त्यापैकी 12 प्राणघातक अपघात आहेत. बाळ्ळी येथे बालरथ उलटून 27 विद्यार्थी जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर या धोकादायक रस्त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मडगाव-कुंकळ्ळी रस्त्यावर जड वाहतुकीदरम्यान वाहनचालकांसाठी अनेक धोके असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक नागरिक या अपघातांना रस्त्यावरील पायाभूत सुविधांचा अभाव कारणीभूत असल्याचे सांगत आहेत. अनेकांकडून सरकारने या रस्त्याचे सखोल ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
येथील काही रस्ते खूप अरुंद आहेत. त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अयोग्य पायाभूत सुविधांमुळे मडगाव-कुंकळ्ळी महामार्गावर आणि पुढे बाळ्ळी येथे अपघात होतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
असे घडलेत अपघात...
सासष्टी तालुक्यातील या रस्त्याविषयी आणि या अपघातांविषयी लोकांमध्ये एक दहशत असल्याचे चित्र आहे. लोकांमध्ये वाढत्या अपघाताच्या घटनांनी अस्वस्थता वाढत आहे. यावर्षी मालवाहतूक ट्रक आणि प्रवासी बस यांच्यात झालेल्या धडकेत चालकासह चारजण गंभीर जखमी झाले होते.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीजवळ कुंकळ्ळी-काणकोण महामार्गालगत एक प्रवासी बस पलटी होऊन दोनजण जखमी झाले.
आणखी एका घटनेत, रात्रीच्या वेळी कुंकळ्ळी-उस्किनीबांध येथे माशांनी भरलेला ट्रकच नाल्यात कोसळला होता. हा ट्रक केरळहून महाराष्ट्रात मासळीची वाहतूक करत होता.
याच मार्गावर विरुद्ध दिशेने जाणारी प्रवासी बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 15 जण जखमी झाले होते. प्रवासी बस काणकोण येथे जात असताना मालवाहू ट्रक कुंकळ्ळीकडे जात असताना हा अपघात घडला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.