Goa Govrnment Jobs: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! विधानसभा निवडणुकीआधी नोकऱ्यांचा पाऊस; मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

Goa Recruitment Commission Jobs: निवडणुकीआधी या खात्‍यांतील ७२२ पदे भरली जाणार असल्‍याची माहिती आयोगाच्‍या सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.
Goa govt recruitment latest update
Goa govt recruitment latest updateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर, सरकारने कर्मचारी भरती आयोगामार्फत गेल्‍या काही महिन्‍यांत घेण्‍यात आलेल्‍या परीक्षांचे अंतिम निकाल जाहीर करून, पात्र उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्‍याच्‍या हालचाली सुरू केलेल्‍या आहेत. त्‍याच धर्तीवर पोलीस, वन तसेच तुरुंग खात्‍यांतील पहिल्‍या सीबीटी परीक्षेचा निकाल चालू आठवड्यात जाहीर करून पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

त्‍यामुळे निवडणुकीआधी या खात्‍यांतील ७२२ पदे भरली जाणार असल्‍याची माहिती आयोगाच्‍या सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

कर्मचारी भरती आयोगाने फेब्रुवारी २०२६ मध्‍ये पोलीस, वन तसेच तुरुंग खात्‍यांत ७२२ पदे भरण्‍यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. यासाठी पहिली सीबीटी परीक्षा घेण्‍यात आली असून, त्‍याचा निकाल याच आठवड्यात जाहीर करण्‍यात येणार आहे.

Goa govt recruitment latest update
Goa Mega Job Fair 2026: राज्यात 3,500 नोकऱ्यांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; तरुणाईने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

त्‍यानंतर पोलिस पदांसाठी शारीरिक चाचणी झाल्‍यानंतर सीबीटी–२ परीक्षा घेण्‍यात येईल आणि त्‍यानंतर परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्‍यात येईल. त्‍यामुळे निवडणुकीआधी या खात्‍यांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्‍यान, कर्मचारी भरती आयोगामार्फत पुढील काळात सरकारी खात्‍यांत आणखी तीन हजारपेक्षा अधिक पदे भरण्‍यात येतील, अशी घोषणा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काहीच दिवसांपूर्वी केली होती. परंतु, आयोगाने ज्‍या परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नाहीत.

Goa govt recruitment latest update
Goa Job Scam: सरकारी नोकरीचा लोभ; गमावले 10 लाख रुपये, फोंडा पोलिसांत तक्रार दाखल

आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिक जणांना मिळाल्‍या नोकऱ्या

कर्मचारी भरती आयोगाची परीक्षा पारदर्शकरीत्‍या होत असल्‍यामुळे सरकारी नोकरीच्‍या प्रतीक्षेत असलेले हजारो विद्यार्थी या परीक्षांना बसत आहेत. आयोगाने आतापर्यंत घेतलेल्‍या परीक्षांमधून एक हजारपेक्षा अधिक युवक–युवतींना सरकारी खात्‍यांत नोकऱ्या मिळाल्‍याचेही सूत्रांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com