

फोंडा: सरकारी नोकरी देण्याच्या आमिषाने फोंड्यात गेल्याच महिन्यात एका प्रकरणाची नोंद झाली असताना आता परत एकदा असेच फसवणूक प्रकरण फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडले असून त्यासंबंधीची तक्रार फोंडा पोलिस स्थानकात आली आहे. मात्र हे प्रकरण साधारण अडीच वर्षांपूर्वी घडले आहे.
सुकूर - बार्देश येथील गोकुळदास तामसे याने यासंबंधी फोंडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार खांडेपार येथील रूपेश साखळकर व त्याचा एक मित्र हळदोणे - बार्देश येथील टॉमी मिरांडा यांनी तक्रारदाराला गाठून त्याच्या मुलाला सरकारी नोकरीची ऑफर दिली.
त्याबदली १० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितल्यावर २०२३ मध्ये सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सायंकाळी 7.30 ते रात्री 8.30 वा. या वेळेत गोकुळदास तामसे याने संबंधितांकडे १० लाख रुपये आणून दिले.
पैसे दिले तरी नोकरीची ऑफर मात्र आली नाही. शिवाय दिलेले पैसेही परत मिळाले नाहीत, अशी स्थिती झाली. पैसे परत मिळतील या आशेवर आपण एवढे दिवस थांबलो; पण पैशांचा पत्ता नसल्याने शेवटी पोलिसांत तक्रार दिल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. पुढील तपास सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.