Ravi Naik | Goa Administration
Ravi Naik | Goa AdministrationDainik Gomantak

Goa Administration: सांगेतील स्वस्त धान्य दुकानदारांसोबत रवी नाईक यांची बैठक!

Goa Administration: सांगेतील नागरीपुरवठा खात्याच्या कार्यालयाला भेट देऊन रवी नाईक यांनी स्थिती जाणून घेतली.
Published on

Goa Administration: प्रशासन जनतेच्या दारी या उपक्रमांतर्गंत जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी कृषीमंत्री तथा नागरीपुरवठामंत्री रवी नाईक यांनी सांगे मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई व इतर अधिकारी उपस्थित होते.

सांगेतील नागरीपुरवठा खात्याच्या कार्यालयाला भेट देऊन रवी नाईक आणि फळदेसाई यांनी स्थिती जाणून घेतली. लहान जागेत कार्यालय चालत असल्याचे पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर सांगे उपजिल्हाधिकारी कार्यालयात स्वस्त धान्य दुकानदारांसोबत बैठक घेतली.

Ravi Naik | Goa Administration
Goa News: सांगेत शाळेतून येताना विद्यार्थिनीचा विनयभंग!

दरम्यान, या बैठकीत दुकानदारांनी समस्या मांडल्या. सरकारने ठरवून दिलेल्या वेळेत खासकरून ग्रामीण भागात दुकान चालविणे शक्य नसल्याने वेळ वाढवून देण्याची मागणी केली. तीन ते सायंकाळी सहा या वेळेऐवजी चार ते रात्री सात अशी वेळ केल्यास नागरिकांच्या सोयीचे होईल असे मंत्र्यांना सांगण्यात आले.

पाजीमळ येथील कृषी कार्यालयाला भेट

मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पाजीमळ येथील कृषी कार्यालयाला भेट दिली. यावेळी रजनीकांत नाईक, संतोष प्रभू देसाई यांनी समस्या मांडल्या. त्यानंतर पुढील दौरा वाडे कुर्डी पंचायत भागात करण्यात आला. रिवण येथील सभामंडपात भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com