Goa Panchayat: कळंगुट येथील रस्ता रुंदीकरण क्षेत्र, पदपथ आणि सार्वजनिक मालमत्तेमध्ये व्यवसाय करणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. सरपंच जोसेफ सिक्वेरा यांच्या नेतृत्वाखाली कळंगुट पंचायतीने येत्या सात दिवसांत अशी दुकाने व गाडे हटविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर पंचायतीकडून कारवाई केली जाईल, असे कळविले आहे.
कांदोळी पंचायतीनेही सार्वजनिक नोटीस जारी करीत, दुकान तसेच गाडेधारकांना १० दिवसांत व्यवसाय हटविण्यास सांगितले आहे. या दोन्ही पंचायतींनी यासंदर्भात ग्रामसभेत ठराव घेतला असून, ही जाहीर नोटीस जारी केली आहे.
दरम्यान, याविषयी कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, सर्व दुकानमालक व गाडेचालकांना नोटीस बजावून रस्ता रुंदीकरण क्षेत्र, पदपथ व सार्वजनिक मालमत्तेमधील व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच, असे न केल्यास पंचायतीकडून ते हटविले जातील व त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल. अशी सुमारे 50 दुकाने व गाडे कळंगुट पंचायत क्षेत्रात आहेत. कांदोळी पंचायत क्षेत्रात पंचायतीची परवानगी न घेताच ठिकठिकाणी लावलेल्या फलकांवर कारवाई केली जाणार आहे.
15 दिवसांत परवाने घ्या!
त्याचप्रमाणे कळंगुट पंचायतीने आणखी एक सार्वजनिक सूचना जारी केली आहे, ज्यामध्ये पंचायतीच्या अधिकार क्षेत्रातील सर्व टॅटू ऑपरेटर आणि बिर्याणी आउटलेटधारकांना येत्या 15 दिवसांत संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून आवश्यक परवाने घेण्याचे निर्देश दिले आहेत. सरपंचांनी जारी केलेल्या या नोटिसीत म्हटले आहे की, या सूचनेचे पालन न केल्यास पंचायत राज अधिनियम 1994 अंतर्गत कारवाई करण्यात येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.