Goa News: सांगेत शाळेतून येताना विद्यार्थिनीचा विनयभंग!

Goa News: सांगेतील सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याने गुन्हेगारांना पकडण्याच्या कामात अडथळे येत आहेत.
Goa News
Goa NewsDainik Gomantak

Goa News: राज्यात मुलांचे अपहरण केले जात असल्याच्या अफवा सुरू असतानाच काल शुक्रवारी सकाळी कुडचडे येथे हायस्कूलला गेलेली विद्यार्थिनी घरी परतत असता, विठ्ठल मंदिर परिसरात अचानक आलेल्या युवकाने तिचा हात पकडला. यावेळी गोंधळलेल्या विद्यार्थिनीने आरडाओरड केल्यामुळे दुचाकी घेऊन आलेला तो युवक पळाला.

दरम्यान, ही घटना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. ती विद्यार्थिनी रडत असल्याचे पाहून या मार्गाने जाणाऱ्यांनी तिची विचारपूस केली असता तिने ही घटना कथन केली. स्थानिक युवकांनी त्या युवकाला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला. या प्रकाराची तक्रार पालकांनी सांगे पोलिस स्थानकात नोंदवली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

Goa News
Goa: गोव्यातील देविदास भांडणकर यांचा देहदानाचा निर्णय!

सांगेतील सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याने गुन्हेगारांना पकडण्याच्या कामात अडथळे येत आहेत. रात्री-अपरात्री काही घटना घडल्यास धागेदोरे सापडत नाहीत. त्यामुळे भुरटे चोर, रोड रोमियोंचे आयतेच फावते. यासाठी सरकारने बंद पडलेले कॅमेरे कार्यान्वित करण्याची मागणी शिवसैनिक यशवंत नाईक यांनी केली आहे.

Goa News
Goa Government: गोंयकार संघटनेचा रस्ता चौपदरीकरणासाठी वृक्षतोडीला 'तीव्र' आक्षेप!

विद्यार्थिनीचा मोबाईल लंपास

आठ दिवसांपूर्वी सांगे उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी पालिका उद्यानात स्वच्छता अभियानासाठी आल्या असता, त्यापैकी एका विद्यार्थिनीचा कुणीतरी मोबाईल घेऊन पळ काढल्याची घटना घडली होती. सांगेत असे प्रकार वाढू लागल्याने आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com