RGP Goa Internal Differences: 'आरजी'मधील वादामुळे लोकांचा झाला भ्रमनिरास; वीरेश बोरकर गोवा राखण्यासाठी करणार युती?

Goa 2027 Assembly Election: आरजी पक्षाविरोधात एक अपशद्ब काढण्याची विरोधकांचीदेखील ताकत नव्हती; परंतु पक्षांतर्गत झालेल्या मतभेदानंतर पक्षाविरोधात बोलले जात आहे
Goa 2027 Assembly Election
RGP Goa Internal DifferencesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आरजी पक्षाविरोधात एक अपशद्ब काढण्याची विरोधकांचीदेखील ताकत नव्हती; परंतु पक्षांतर्गत झालेल्या मतभेदानंतर पक्षाविरोधात बोलले जात आहे, असे ‘आरजी’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले.

आम्ही पक्ष काढला होता तो भांडण्यासाठी नव्हे तर गोवा राखण्यासाठी, स्थानिकांच्या हक्कांसाठी. आमच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. पक्ष पुढे नेण्यासाठी आमच्यातील अंतर्गत मतभेद मिटविणे गरजेचे आहे. आरजीतील वादामुळे लोकांचा भ्रमनिरास झाला, असे आमदार बोरकर यांनी सांगितले.

Goa 2027 Assembly Election
'आरजी'समोर आता भाजप नव्हे, तर स्वतःच्या अस्तित्वाचं मोठं आव्हान! नेतृत्वातील मतभेदांमुळे पक्षाची घसरगुंडी?

‘गोमन्तक टिव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘ब्लॅक ॲण्ड व्हाईट’ कार्यक्रमात बोरकर बोलत होते. बोरकर म्हणाले की, आमच्या पक्षसंघटनेच्या समित्या स्थापना झाल्यावर संघटनेशी चर्चा करून जनतेच्या हितासाठी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांशी ‘कॉमन मिनीमम’ कार्यक्रम ठरवून युती करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

बोरकर म्हणाले...

आम्ही भाजप सरकारविरोधात लढा देत आहोत, त्यामुळे आमची व भाजपची युती कधीही होणे शक्य नाही. ‘आरजी’ला राज्यातील प्रत्येक तालुक्यात आपले स्वतःचे अस्तित्व आहे, गोवा राखण्याचा विचार आहे, त्यामुळे ‘आरजी’ कधीही कोणत्या पक्षात विलीन करणार नाही. आमचे पक्षातंर्गत जे काही मतभेद झाले, ते मिटत आले होते. एकत्र बसून तोडगा काढण्याचा निर्णय झाला होता; परंतु अचानक अजय खोलकर यांनी विरोध केला.

Goa 2027 Assembly Election
खरी कुजबुज: दामूंचा कुंकळ्ळी दौरा!

मला जाणीव आहे की, २०२७ ची विधानसभा निवडणूक म्हणावी तितकी सोपी नाही. आमच्यासमोरील आव्हानेदेखील वाढली आहेत; परंतु कार्यकर्त्यांच्या बळावर याही निवडणुकीत चांगली कामगिरी करू. मी आजपर्यंत कोणत्याच माध्यमांवर टीका केलेली नाही. पत्रकारांना आपली बाजू मांडण्याचा, टीका करण्याचा अधिकार आहे, त्यावर गदा कोणीच आणू शकत नाही.

म्हणून पुन्हा उभा राहिलो!

‘आरजी’त आम्ही एकत्रितपणे काम करत होतो. मनोज परब हे आमच्या पक्षाचा चेहरा होते, त्यामुळे आम्ही पद न पाहता त्यांच्यामागे उभे राहायचो. या प्रकरणानंतर मीदेखील खचलो होतो. कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली; परंतु पक्षसंघटना मध्येच सोडता येणार नसल्याने पुन्हा उभा राहिलो आहे. मागील दोन महिन्यांत माझ्यावर अनेक वैयक्तिक आरोप करण्यात आले; परंतु हे असले आरोप कोणत्याही पुराव्याविना करणे योग्य नसल्याचे मत बोरकर यांनी व्यक्त केले.

Goa 2027 Assembly Election
RGP Internal Dispute: खोलकरांच्‍या बडतर्फीच्‍या आदेशाला बोरकरांकडून वाटाण्‍याच्‍या अक्षता; 'मीच राष्ट्रीय अध्यक्ष!' म्हणत वीरेश बोरकरांनी ठोकला दावा

विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज!

‘आरजी’ची ताकद मोठी आहे. राज्यातील सुमारे १५ मतदारसंघांत आमची स्थिती चांगली आहे. अनेकांना सत्तरीत जिंकणे कठीण वाटते; परंतु तेथे ‘आरजी’ला चांगला प्रतिसाद आहे. काणकोणमध्ये प्रतिसाद चांगला मिळतो. मागच्या निवडणुकीत काही मतदारसंघांत अवघ्या मतांनी आमच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येणे गरजेचे असल्याचे मत वीरेश बोरकर यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com