'आरजी'समोर आता भाजप नव्हे, तर स्वतःच्या अस्तित्वाचं मोठं आव्हान! नेतृत्वातील मतभेदांमुळे पक्षाची घसरगुंडी?

Revolutionary Goans Party Internal Conflict: गोव्याची जमीन, ओळख आणि हक्क वाचवण्यासाठी एका नव्या चळवळीची गरज होती. त्यातूनच २०१७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मनोज परब यांच्या नेतृत्वाखाली रिव्होल्युशनरी गोवन्स चळवळीची सुरुवात झाली.
Revolutionary Goans Party Internal Conflict
Revolutionary Goans Party Internal ConflictDainik Gomantak
Published on
Updated on

गौरेश गावकर

Revolutionary Goans Party Leadership Crisis: विरोधी पक्ष म्हणून ‘आरजी’चे भवितव्य उज्ज्वल असल्याची भावना गोमंतकीय जनतेत निर्माण झाली होती. सक्षम पर्याय म्हणून हा पक्ष बळकट होईल, अशी अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली होती. पण, नेतृत्वावरून निर्माण झालेले मतभेद अन् संघटनात्मक प्रश्नामुळे पक्षाची चक्रव्युहात अडकल्यासारखी स्थिती झाली असून ‘आरजी’ची सामाजिक प्रश्‍नांबाबतची संघर्षाची तडफ विरली की काय?असा प्रश्‍न गोमंतकीयांना पडला आहे.

गोव्याची जमीन, ओळख आणि हक्क वाचवण्यासाठी एका नव्या चळवळीची गरज होती. त्यातूनच २०१७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मनोज परब यांच्या नेतृत्वाखाली रिव्होल्युशनरी गोवन्स चळवळीची सुरुवात झाली. अल्पावधीत या चळवळीला बहुजन समाज आणि गोव्याच्या तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी आपल्या नोकऱ्या, व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून या चळवळीसाठी काम केले.

२०२२ मध्ये या चळवळीचे रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी मध्ये रूपांतर झालं. पहिल्यांदाच पक्षाने विधानसभा निवडणूक लढवली आणि सांत आंद्रे मतदारसंघातून वीरेश बोरकर आमदार झाले. हा पक्षाचा पहिला मोठा राजकीय विजय होता. जवळपास १० टक्के मतं मिळाल्यामुळे ‘आरजी’ गोव्यात एक पर्याय म्हणून पुढे येत असल्याचं चित्र दिसू लागलं. अनेकांना वाटत होतं की बहुजन समाजाच्या नेतृत्वाखाली गोव्याच्या राजकारणात एक नवा पर्याय उभा राहत आहे.

मात्र, सामाजिक चळवळ चालवणं आणि राजकीय पक्ष चालवणं यात खूप फरक असतो. ‘आरजी’ अजूनही अनेक बाबतीत चळवळीच्या पद्धतीनेच काम करत असल्याचं दिसत राहिलं. त्याचा परिणाम २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला. त्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. ‘इंडिया’ आघाडीत सहभागी न झाल्यामुळेही पक्षावर टीका झाली.

यानंतर मात्र, पक्षाने स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा पंचायत आणि २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याची चर्चा सुरू झाली. जरी आघाडी झाली नाही, तरी ‘आरजी’ने पुन्हा जवळपास १० टक्के मतं मिळवली आणि सांत आंद्रेमध्ये दोन जिल्हा पंचायत जागाही जिंकल्या.

Revolutionary Goans Party Internal Conflict
Goa Under 19 Cricket Team: गोव्याच्या युवा संघाचा रोमहर्षक विजय, कमी धावसंख्येच्या सामन्यात हिमाचलला दोन विकेटने नमविले

गोव्याची जमीन, ओळख आणि हक्कांच्या संरक्षणाच्या चळवळीतून उदयास आलेल्या या पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी पक्षाची भूमिका ठामपणे मांडत केलेल्या महत्त्वपूर्ण उपोषणाची दखल केवळ गोव्यातच नव्हे, तर देशभरातही घेण्यात आली. त्यांच्या आंदोलनाला गोव्यातील तरुणाईने दिलेला उत्स्फूर्त पाठिंबा पाहता, विरोधी पक्ष म्हणून ‘आरजी’चे भवितव्य उज्ज्वल असल्याची भावना गोमंतकीय जनतेत निर्माण झाली होती. भाजप आणि काँग्रेसला सक्षम पर्याय म्हणून हा पक्ष अधिक बळकट होईल, अशी अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली होती.

पण इथूनच पक्षातील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर ैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैयेऊ लागला. पक्ष दोन गटात विभागला गेला एक मनोज परब यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा वीरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली. वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता, नेतृत्वावरून निर्माण झालेले मतभेद आणि संघटनात्मक प्रश्न यामुळे हा संघर्ष अधिक तीव्र होत गेला.

मनोज परब यांनी पक्षपद आणि सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. पण निवडणुका जवळ येत असताना भाजपविरोधात लढण्याऐवजी दोन्ही गट एकमेकांवरच टीका करण्यात व्यग्र असल्याचं चित्र दिसत आहे. याचा सर्वात मोठा फटका पक्षाला, कार्यकर्त्यांना आणि मतदारांना बसत आहे.

आज ‘आरजी’समोरची सर्वात मोठी लढाई भाजप, काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशी नाही. सर्वात मोठी लढाई स्वतःच्या अस्तित्वाची आहे. पक्षातील नेत्यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हा पक्ष एखाद्या व्यक्तीसाठी नव्हे, तर एका विचारासाठी उभा राहिला होता.

गोव्यात आजही अनेक तरुण, बहुजन समाजातील कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांना मजबूत पर्यायाची अपेक्षा आहे. जर ‘आरजी’ पुन्हा एकसंध झाली, तर त्या अपेक्षांना नवी दिशा मिळू शकते. पण जर अंतर्गत संघर्ष असाच सुरू राहिला, तर त्याचा फायदा इतर पक्षांना होईल आणि सर्वात मोठं नुकसान ‘आरजी’चंच होईल.

Revolutionary Goans Party Internal Conflict
Goa Dairy Consultant Appointment: कन्सल्टंट नियुक्तीखाली पैशांची उधळपट्टी; गोवा डेअरीवर दूध उत्पादकांचा आरोप

राजकारणात मतभेद असणं स्वाभाविक आहे. पण ते संवादातून सोडवले गेले पाहिजेत. कोणताही नेता पक्षापेक्षा मोठा नसतो. कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाने हा पक्ष उभा केला, तो विश्वास टिकवण्याची जबाबदारी नेतृत्वावर आहे.

जर वीरेश बोरकर पक्षाचं नेतृत्व करण्यास तयार असतील, तर त्यांनी आता ठामपणे पुढाकार घ्यायला हवा. पक्षाला पुन्हा एकत्र आणण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. कारण वेळ निघून गेल्यानंतर पश्चात्ताप करून उपयोग होणार नाही.

इतिहासात अनेक पक्ष अंतर्गत संघर्षामुळे संपले आहेत, तर काही पक्षांनी योग्य वेळी चुका सुधारून पुन्हा उभारी घेतली. ‘आरजी’ कोणत्या मार्गाने जाणार, हे आता त्यांच्या नेतृत्वाने ठरवायचं आहे.

कारण शेवटी एकच गोष्ट खरी आहे, पक्ष संपला तर कोणाचाही विजय होणार नाही. पण पक्ष वाचला, तर गोव्याला पुन्हा एक सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय मिळू शकतो. आता निर्णय ‘आरजी’च्या नेतृत्वाच्या हातात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com