वास्कोवासियांनी बायणा किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळवण्यासाठी पाठिंबा द्यावा

टोलसंबंधीची भीती वाहनचालकांनी मनातून काढून टाकावी असे आवाहन वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केले.
आमदार कार्लुस आल्मेदा वास्कोवासियांना आवाहन करतांना
आमदार कार्लुस आल्मेदा वास्कोवासियांना आवाहन करतांनाDainik Gomantak

दाबोळी: येथील बाजारपेठेला आर्थिक उर्जा लाभण्यासाठी वास्कोवासियांनी (Vasco) बायणा किनारयाला ब्ल्यू फ्लॅग ( Blue Flag) मानांकन मिळावे यासाठी पाठिंबा द्यावा. तसेच मुरगाव बंदरापर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 17(B)वरून शहर भागापर्यंत ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना कोणताही टोल द्यावा लागणार नाही. त्यामुळे टोलसंबंधीची (Toll Gate) भीती वाहनचालकांनी मनातून काढून टाकावी असे आवाहन वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी शनिवारी येथे केले.

बायणा किनारयासाठी नील ध्वज मानांकन मिळविणे, सेंट अँड्रयू चर्च चौकाचे सौंदर्यीकरण व विकास, चौपदरी राष्ट्रीय महामार्गा संबंधी टोल प्रश्न तसेच विविध कामांसंबंधी माहिती देण्यासंबंधी तसेच उपस्थितांच्या शंकाचे निरासन करण्यासाठी आमदार आल्मेदा यांनी बायणा रवींद्र भवनामध्ये खास बैठक बोलाविली होती. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार आल्मेदा यांच्यासह उपनगराध्यक्ष श्रध्दा महाले, रवींद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव, नगरसेवक फ्रेड्रिक हेन्रिक्स,यतीन कामुर्लेकर, नारायण बोरकर, मातियस मोंतरो, देविता आरोलकर, माजी नगरसेवक धनपाल स्वामी होते.

एककाळ वास्को बाजारपेठेत मोठी तेजी होती. परंतू गेल्या काही वर्षापासून येथील पर्यटनसंबंधी व्यवसाय पर्यटकाअभावी डबघाईला आले आहेत. त्यामुळे बाजारपेठेमध्ये तेजी आणण्यासाठी बायणा किनारयाला नील ध्वज मानांकन मिळवून, किनारयाला पुन्हा वैभव मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे. बायणा किनारा हा मुरगाव मतदार संघामध्ये येत असला, तरी या किनारयाचा विकास झाल्यास त्याचा मोठा लाभ वास्को मतदार संघातील बाजारपेठेला होणार असल्याचे आल्मेदा यांनी सांगितले. आपण दुसरयाच्या मतदार संघामध्ये ढवळाढवळ करीत नसून, वास्को बाजारपेठेला उर्जा लाभावी यासाठी आपले प्रयत्न आहेत. बायणा किनारयावरील मच्छिमार बांधवांनाही विश्वासात घेण्यात येणार आहे.त्यासाठी एक समिती निवडण्यात आली आहे. ती समिती संबंधित लोकांकडे चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार कार्लुस आल्मेदा वास्कोवासियांना आवाहन करतांना
Goa Taxi: आम्ही तुम्हाला निवडून आणले, म्हणत टॅक्सी व्यावसायिकांची आमदार सोपटे यांच्याकडे चर्चा

टोल नाका कोठे तयार करण्यात येणार?

याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार तानाजी काटकर यांनी वरुणपुरी ते मुरगाव बंदर तसेच सडा पर्यंतच्या चौपदरी महामार्गासंबंधी पीपीईद्वारा माहिती दिली. त्यांनी टोल नाका कोठे असेल, वास्को शहरातील वाहने उड्डाण पुलावर कोणत्या मार्गावर येतील. बायणामध्ये वाहने खालील रस्त्यावर येणारयासाठी कोठे फाटा असेल, मुरगाव बंदरात कोणत्या फाटा गेला यासंबंधी त्यासंबंधी माहिती दिली. वास्को शहर व सेंट अँड्रयू चर्च चौक सौंदर्यीकरण व पर्यटन विकास यासंबंधी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे सल्लागार रामाणी यांनी थ्री डि पीपीई द्वारा माहिती दिली. पादचारी व शालेय विद्यार्थ्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली आहे. वाहतूक व पार्किंग व्यवस्था कशी असेल यासंबंधी माहिती दिली. सीआयआयचे अध्यक्ष अतुल जाधव यांनी नील ध्वज मानांकन संबंधी थोडक्यात माहिती दिली.

ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी 33 निकषांचा विचार केला जातो

सदर मानांकन मिळावे यासाठी प्रत्येकाने पाठिंबा देण्याची व प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर समुद्रकिनारयांचे स्थान मोठे असते. जगभरात किनारयांचे पर्यटनमूल्य वाढले आहे. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय ठोकळ उत्पादनामध्ये भर पडतेच शिवाय स्थानिक स्तरावरील उदरनिर्वाहाची साधनेही वाढली जातात. किनारपट्टीची ‘इकोसिस्टम’ टिकविण्याची असेल ,तर पर्यटन व किनारपट्टी संवर्धन या दोन्हीचे हित साधेल अशी यंत्रणा विकसित करण्याची गरज असते. ब्ल्यू फ्लॅग मानांकन प्रदान करताना 33 निकषांचा विचार केला जातो. ते 33 निकषे पूर्ण करण्याठी सर्वाचे सहकार्य गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार कार्लुस आल्मेदा वास्कोवासियांना आवाहन करतांना
Goa: संतप्त कळंगुट वासियांचा स्थानिक वीज केद्रांवर मोर्चा

यावेळी उपस्थित असलेल्या विविध व्यावसायिकांच्या प्रतिनिधींनी वास्कोमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील पर्यटक येण्यासाठी बायणा किनारयाला ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळण्याची गरज व्यक्त करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच आमदार कार्लुस आल्मेदा यांनी हाती घेतलेल्या भविष्यातील विकासकामामुळे वास्कोकडे पर्यटक आकर्षित होती असे सांगून कौतुक केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com