Goa Politics: "तुम्ही भाजपची B-Team, आम्हीच तुम्हाला नाकारतो", काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत; गोवा निवडणुकीत काँग्रेस 'एकला चलो रे'

Congress surendra rajput statement: आदमी पार्टीचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवत, गोवा निवडणुकीत काँग्रेस 'एकला चलो रे' धोरण स्वीकारणार असल्याचे स्पष्ट
goa elections 2025
goa elections 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विधानसभा निवडणूक २०२७ जसजशी जवळ येत आहे, तसतसे विरोधी पक्षांमध्येच शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवत, गोवा निवडणुकीत काँग्रेस 'एकला चलो रे' धोरण स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले.

"तुम्ही नाकारण्याआधी आम्हीच तुम्हाला नाकारतो!"

गोवा दौऱ्यावर असलेल्या केजरीवाल यांनी शनिवारी (दि. ४) रोजी काँग्रेससोबत कोणतीही युती न करण्याचे जाहीर केले होते. काँग्रेसवर 'विश्वास ठेवता येणार नाही' आणि 'ते भाजपला सरकार स्थापनेत मदत करत आहेत,' असे त्यांचे म्हणणे होते. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी केजरीवाल यांच्या युती नाकारण्याच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. राजपूत म्हणाले, "तुमच्यासोबत कोण निवडणूक लढवणार? आम्ही तुम्हाला नाकारतो. काँग्रेस गोव्यात स्वबळावर निवडणूक लढवेल."

'भाजपची बी-टीम' आणि मतांचे विभाजन

राजपूत यांनी 'आप'वर जनतेचा विश्वासघात केल्याचा आणि 'फॉर्म्युले' तयार करून विरोधकांची मते विभाजित करण्याचा आरोप केला. काँग्रेस नेत्याने केजरीवाल आणि त्यांच्या पक्षावर थेट आरोप केला की, त्यांनी 'अण्णा हजारे आंदोलन' विकले, 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' विकले आणि 'फॉर्म्युले' तयार करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखांना मदत केली.

goa elections 2025
Goa Politics: '60 वर्षे गोव्यावर ठराविक कुटुंबांचीच पकड! फॅमिलीराज संपवणे गरजेचे'; केजरीवालांनी घेतले भाजप, काँग्रेसवर तोंडसुख

"ते भाजपची 'बी-टीम' (BJP’s B-Team) म्हणून काम करत आहेत," असा गंभीर आरोप राजपूत यांनी केला. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील 'आप' विरोधी पक्षांची मते फोडण्यासाठीच ओळखली जाते, असेही ते म्हणाले. या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे गोव्यात भाजपविरोधात होणारी विरोधी पक्षांची संभाव्य एकजूट धोक्यात आल्याचे चित्र समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com