सलमान, अझरुद्दीनचे विजयला मेसेज
विजय सरदेसाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना कित्येकांनी शुभेच्छा दिल्या. मात्र दोन शुभेच्छा खास होत्या. त्यात एक संदेश होता बॉलिवूड स्टार सलमान खान आणि दुसरा संदेश होता तो भारताचा माजी क्रिकेट कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांचा. शिवाय गोव्यातील उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांच्याही व्हिडिओ संदेशाचा समावेश होता. विजयला शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे नाशिकचे माजी आमदार अनिल कदम हे स्वतः उपस्थित होते. विजयचे आता नव्याने ‘ऑपरेशन विजय’ सुरू होणार, असा सूर यावेळी जवळजवळ सगळ्याच नेत्यांनी व्यक्त केला. ∙∙∙
वीजमंत्र्यांनाच ‘शॉक’
स्मार्ट मीटरचा विषय ऐरणीवर आला असतानाच मुख्यमंत्र्यांनी तो होल्डवर ठेवून त्यातील हवाच काढून घेतली आहे. त्यांनी शब्द दिल्यामुळे हा विषय थंडावला आहे. पण ‘आप’वाले आपला हेका सोडायला तयार नाहीत. त्यांनी वीजमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. आता हा विषय कुठपर्यंत आणि कितपर्यंत जाईल माहीत नाही. पण सध्या तरी ‘आप’मुळे वीजमंत्र्यांना एखाद्या कार्यक्रमाला जायचे झालेच, तर त्यांच्यासोबत पोलिस तैनात असतात. या ‘आप’वाल्यांनी नाकीनऊ आणले आहेत त्यांच्या, असे आम्ही नव्हे तर मंत्र्यांचेच कार्यकर्ते म्हणू लागले आहेत.
गिरीशची गुगली!
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे रोखठोक बोलतात. त्यामुळे त्यांचे बरेच विरोधकही आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्मार्ट मीटर व दंड आकारणीस स्थगिती दिली असली तरी हा विषय काही सरकारची पाठ सोडत नाहीय. विधानसभा निवडणुकीला अवघेच दिवस बाकी असताना स्मार्ट मीटर बसविण्याचा धडाका सरकारने लावला आणि वीज खात्याविरोधात विरोधकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. हे प्रकरण अधिक तापू नये, म्हणून मुख्यमंत्र्यांनी जी काळजी घ्यायची ती घेतली. पण चोडणकरांनी रविवारी गुगली टाकलीच. मंत्री दिगंबर कामत यांनी मडगावातील वीज खात्याच्या कार्यालयात स्मार्ट मीटरविषयी आंदोलन केले होते, ते भाजपच्या सांगण्यावरूनच, असे सांगत राजकीय चर्चेला हवा दिली. वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे मगोचे नेते असल्यामुळे चोडणकरांची ‘गुगली‘ किती ‘बाऊन्स’ (उसळी) घेते, हे पहावे लागेल.
विजयच्या वाढदिवसाला मायकलबाब!
विजय सरदेसाई हे जरी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष असले तरी त्यांचे सगळ्याच पक्षांतील नेत्यांशी मित्रत्वाचे संबंध आहेत. काल त्यांच्या वाढदिवसाला त्याचाच प्रत्यय झाला. भाजपचे आमदार मायकल लोबो हेही विजयचे चांगले मित्र आहेत. शुभेच्छा देण्यासाठी ते स्वतः उपस्थित राहिले आणि तेही त्यांच्या जाहीर कार्यक्रमाच्या ठिकाणी. शिवाय सरदेसाईंच्या घरी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्यासह माजी मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्स, फिलिप डिसोझा, माजी आमदार बाबाशान डिसा, क्लाफास डायस हेसुद्धा उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, युवा काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक, काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर हेही आले होते. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा, ‘आप’चे आमदार व्हेंझी व्हिएगस हेही उपस्थित होते. या जाहीर कार्यक्रमात कित्येक भाजप कार्यकर्तेही दिसत होते.
बाबूंची झाली गोची
‘बाप्पाय ना आनी पुडवेंय ना’ अशी गत आता माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची झाली आहे. ज्यावर बाबूंचे राजकीय भवितव्य निर्भर आहे, तोच केपे मतदारसंघ एसटीसाठी राखीव होण्याची शक्यता आहे. आपला हक्काचा मतदारसंघ राखीव होण्याच्या चिंतेत बाबू होतेच, पण आता केंद्र सरकारने धनगर समाजाला एसटी दर्जा नाकारल्यामुळे बाबूंपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. भाजप सरकार धनगर समाजाला एसटी दर्जा देऊन न्याय देणार असे कालपर्यंत बाबू या समाजाला तावातावाने सांगायचे. मात्र केंद्राने हात आखडता घेतल्याने बाबू संकटात सापडले आहेत, हे मात्र खरे.

कार्यकर्त्यांचा युरींवर ‘फोग’
गोव्यात काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलून पंधरा दिवस होत आले तरी हा बदल अजून काही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेला दिसत नाही. मडगाव येथील एका हॉटेलमध्ये जिल्हा व गट समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यावर ‘फोग’ काढताना असा निर्णय घेण्यापूर्वी सर्व पदाधिकाऱ्यांना का विश्वासात घेतले नाही, असा सवाल केला. आम्हा सर्वांना अमित पाटकर यांनी पुढे आणले होते आणि आम्ही कामालाही लागलो होतो. अशा परिस्थितीत प्रदेशाध्यक्ष का बदलला, असा त्यांचा सवाल होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.