Goa Road Accidents: बेफाम वेगाचे चार बळी, रविवारी चार ठिकाणी रस्‍ते अपघात; साडेपाच महिन्‍यांत 116 जणांचा मृत्‍यू

Goa Over Speeding Accident Deaths: राज्यातील रस्ते अपघातांचे सत्र काही केल्या थांबेनासे झाले आहे. यावर्षी १ जानेवारी ते १४ जूनपर्यंत १०८ रस्ते अपघातांमध्ये तब्बल ११६ जणांचा बळी गेला आहे.
Goa Road Accidents
Goa Road AccidentsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील रस्ते अपघातांचे सत्र काही केल्या थांबेनासे झाले आहे. यावर्षी १ जानेवारी ते १४ जूनपर्यंत १०८ रस्ते अपघातांमध्ये तब्बल ११६ जणांचा बळी गेला आहे. रविवारी चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये चौघांचा बळी गेला. बहुतेक अपघात भरवेगाने वाहने चालविल्यामुळे झाले आहेत.

अनमोड घाटात ट्रक कोसळून चालक ठार

स्थानिक वार्ताहरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनमोड घाटातील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे टिप्पर (क्र.जीए ०६ टी७४७५) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक खोल दरीत कोसळला. रविवारी पहाटे सुमारे ६.४५ वाजता हा अपघात झाला. त्यात ट्रकचालक तापस तपन मिस्त्री (वय ३३ वर्षे, रा. सुकांतपल्ली, पश्चिम बंगाल) यांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

दूध आणायला गेले अन् प्राणास मुकले

दुसऱ्या घटनेत धारबांदोडा पेट्रोल पंपजवळ एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. आज सकाळी साडेनऊ वाजता हा अपघात झाला. मृत दुचाकीस्वाराचे नाव विजय चव्हाण (वय ६९ वर्षे) आहे. सकाळी दूध आणण्यासाठी ते धारबांदोड्याला निघाले होते.

तत्पूर्वी ते दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी पंपकडे वळले असता मागून येणाऱ्या भरधाव दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला जोरदार ठोकर दिली. त्यात चव्हाण हे गंभीर जखमी झाले. फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातातील दुसरा दुचाकीस्वार निखिल नाईक (रा. डोंगरी) हा जखमी झाला आहे.

कार धडकेत पोलिस कर्मचारी ठार

पोलिस कॉन्स्टेबल केतन गावडे (वय २९ वर्षे, रा. कुंभारजुवे) हे शनिवारी सकाळी सावतावाडा-कळंगुट येथे रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले होते. गोमेकॉत उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. गावडे हे ड्युटी आटोपून शनिवारी सकाळी कुंभारजुवे येथील आपल्या घरी दुचाकीवरून निघाले होते. मात्र, कळंगुट येथे समोरून भर वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.

Goa Road Accidents
Goa Recruitment: जीपीएससी भरती होणार ऑनलाईन; गैरप्रकारांना बसणार आळा, एकाच डिजिटल व्यासपीठावरून भरती

कारवार जिल्ह्यातील अंकोला येथून देवदर्शनानंतर मडगावकडे परतताना कुंकळ्ळी पोलिस स्थानकाजवळ झालेल्या स्वयंअपघातात अजय पांढरेकर (वय ३१ वर्षे) या मालभाट येथील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. जखमी अजय याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अजय पांढरेकर हा आपल्या दोन मित्रांसह कारने कर्नाटकातील अंकोला येथे देवदर्शनासाठी गेला होता.

Goa Road Accidents
Goa Politics: भाजप, मगो आणि काँग्रेसच्या चक्रव्युहात अडकलेला प्रियोळ मतदारसंघ!

देवदर्शन झाल्यानंतर मडगावच्या दिशेने परतताना कुंकळ्ळी पोलिस स्थानकाच्या परिसरात त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी फूटपाथला धडकली. यावेळी अजयला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर अजय आणि त्याच्या मित्रांना बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. नंतर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले. पण त्याठिकाणी प्रकृती स्थिर नसल्याने त्याला गोमेकॉत दाखल केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com