'अमित पाटकरांची खाण प्रमोद सावंतांच्या आशिर्वादाने सुरुये, दोघेही गोमंतकीयांना मूर्ख बनवतायेत'; अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal statement Goa: आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोवा काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपवर धारदार शब्दांत हल्ला चढवला
Kejriwal Goa visit
Kejriwal Goa visitDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Arvind Kejriwal Goa: आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोवा काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपवर अत्यंत धारदार शब्दांत हल्ला चढवला आहे. काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या खाण व्यवसायावरून त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांमध्ये साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

खाण व्यवसायावरून केजरीवाल यांचा स्फोटक दावा

गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्या खाण व्यवसायावर बोट ठेवत केजरीवाल म्हणाले, "गोव्यात खाण व्यवसाय मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याशिवाय चालूच शकत नाही. वरवर पाहता हे दोन पक्ष एकमेकांचे विरोधक असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात ते संगनमत करून काम करतात. ही व्यवस्था आता बदलण्याची गरज आहे."

Kejriwal Goa visit
Arvind Kejriwal Goa: 'जनतेचा भाजप, काँग्रेसवरील विश्वास उडाला आहे'! अरविंद केजरीवालनी केला दावा; ‘आप’च्या बैठकांसाठी गोव्यात दाखल

या आरोपांना बळ देण्यासाठी त्यांनी एका गोवावासी प्रवाशाचा हवाला दिला. केजरीवाल म्हणाले, "माझ्या नुकत्याच झालेल्या विमान प्रवासात मला एक गोमंतकीय प्रवासी भेटला, त्याने स्पष्टपणे सांगितले की, 'काँग्रेसचे गोवा अध्यक्ष अमित पाटकर यांचा खाण व्यवसाय आहे आणि तो मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय चालू शकत नाही.

हे दोघेही गोव्याच्या लोकांना मूर्ख बनवत आहेत.' " हाच धागा पकडून केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये 'निश्चितपणे साटेलोटे असून, गोव्यातील जनतेची सर्रास फसवणूक केली जात आहे,' असा आरोप केला.

सरकारी कार्यालयांच्या अनास्थेवर टीका

केजरीवाल यांनी यासोबतच सरकारी कार्यालयांमध्ये लोकांना होणाऱ्या त्रासावरही टीका केली. "सरकारी कार्यालयांत अनेकदा लोकांना योग्य मदत मिळत नाही आणि त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो," असे त्यांनी सांगितले. यावर उपाय म्हणून, 'आप' पक्ष लोकांच्या मदतीसाठी पुढे येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"तुम्ही आमच्या कार्यालयात या, आम्ही तुम्हाला सर्व कामांमध्ये विनामूल्य मदत करू. गोव्यातील लोकांसाठी अनेक सरकारी योजना आहेत, पण माहितीअभावी स्थानिकांचा गोंधळ होतो. आम्ही तुम्हाला प्रत्येक योजनेबद्दल मार्गदर्शन करू आणि तुम्हाला लाभ मिळेल याची खात्री करू," असे आश्वासन केजरीवाल यांनी यावेळी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant Mapusa Fish Market Visit
Goa election 2027 AAP Congress
Goa First Alliance Formation
Goa First Alliance 2027
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com