Goa Petrol-Diesel Prices: गोव्यातील पेट्रोल-डिझेल दरांमध्ये बदल; जाणून घ्या ताजे दर

Goa Petrol-Diesel Prices 22 November 2023: इस्त्रायल-हमास युद्धामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किंमतींवर दबाव
Goa Petrol-Diesel Prices
Goa Petrol-Diesel Prices Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Petrol-Diesel Prices 22 November 2023: गोव्यातील इंधन दरांमध्ये बुधवारी 22 नोव्हेंबर रोजी बदल झाले आहेत. पेट्रोल दरात उत्तर गोवा आणि पणजी येथे प्रतीलीटर 0.19 पैशांनी घट झाली. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोलचे प्रतीलीटर दर 0.31 पैशांनी वाढले.

डीझेल दरांमध्येही उत्तर गोवा आणि पणजी येथे प्रतीलीटर 0.18 पैशांनी घट झाली तर दक्षिण गोव्यातील डीझेल दरामध्ये प्रतीलीटर 0.30 पैशांची वाढ झाली.

देशातील तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोलियम उत्पादनांचे नवीन दर जाहिर केले जात असतात. इस्त्रायल हमास युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतींवर प्रचंड दबाव आहे. दरम्यान, इंधनाच्या किमतींवर चलन विनिमय दर, कच्च्या तेलाच्या किंमती, जागतिक संकेत इंधनाची मागणी या घटकांचा परिणाम होत असतो.

Goa Petrol-Diesel Prices
Goa Crime: धक्कादायक! 19 वर्षीय विद्यार्थिनीचा बस कंडक्टरने केला विनयभंग; मुलगी अल्पवयीन असल्यापासून करत होता छळ

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.35

Panjim ₹ 97.35

South Goa ₹ 97.42

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.92

Panjim ₹ 89.92

South Goa ₹ 89.98

Goa Petrol-Diesel Prices
Shivamogga-Goa Flight: 'या' दिवशीपासून सुरू होणार शिवमोग्गा-गोवा फ्लाईट; उडान योजनेंतर्गत स्टार एअर देणार सेवा

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com