Goa Crime: धक्कादायक! 19 वर्षीय विद्यार्थिनीचा बस कंडक्टरने केला विनयभंग; मुलगी अल्पवयीन असल्यापासून करत होता छळ

संशयिताला अटक; 'पॉक्सो' नुसार गुन्हा दाखल
Goa Crime:
Goa Crime:Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Crime: गोव्यात बसमधून प्रवास करत असताना एका 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी बस कंडक्टरला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. हा बस कंडक्टर 20 वर्षांचा आहे.

संबंधित विद्यार्थिनी बसमध्ये चढली की ती उतरेपर्यंत हा कंडक्टर तिच्याकडे पाहत राहायचा. तिला लज्जा निर्माण होईल, असे वर्तन त्याने केल्याचे सांगितले जात आहे.

या मुलीला शिक्षणासाठी याच बसने जावे लागायचे आणि या बसमध्ये संबंधित कंडक्टर गेल्या वर्षभरापासून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. वारंवारच्या त्रासाला संबंधित विद्यार्थिनी कंटाळली होती.

सोमवारी कंडक्टरने तिचा विनयभंग केल्यानंतर विद्यार्थिनीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार कंडक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Goa Crime:
Margao News: गांधी मार्केटमध्ये बाहेरून येणारी तांबडी भाजी विकू देणार नाही; बाबू आजगावकर

पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी सांगितले की, विद्यार्थिनीने सोमवारी म्हापसा पोलिस ठाण्यात संबंधित बस कंडक्टरविरोधात तक्रार दाखल केली. संबंधित विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, हा बस कंडक्टर ती 12 वी मध्ये असल्यापासून म्हणजेच ती अल्पवयीन असल्यापासून तिचा लैंगिक छळ करत होता.

संबंधित विद्यार्थिनी थिवी ते म्हापसा असा प्रवास करायची. म्हापसा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्या विरोधात भारतीय दंड संहिता, गोवा बाल कायदा आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या प्रकाराबद्दल गोव्यातून चीड व्यक्त होत असून दोषीवर त्वरीत कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa 97 Voters Electoral Roll
Goa protests in last five years
Goa Casino Director Shooting Case
Western Zonal Council Meeting
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com