Goa Monsoon 2023: राज्‍यभरात पावसाचे थैमान; झाडे, दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

अर्धशतकाच्‍या उंबरठ्यावर : आतापर्यंत 46 इंच, महिलेचा बळी;
Monsoon Update
Monsoon UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon 2023 बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्री वारे तसेच ट्रफ्समुळे राज्यात बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत असून बुधवारी नाकेरी येथे ओहोळात वाहून गेलेली फ्लोरिना डिसोझा या महिलेचा मृतदेह आज सापडला . गेल्या २४ तासांत राज्यात १३३.६ मिमी. म्हणजेच ५.२५ इंच पावसाची नोंद झाली.

सर्वाधिक पाऊस २८ जून रोजी १४२.५ मिमी. (५.६१ इंच) बरसला होता. मॉन्सूनला सुरुवात झाल्यापासून २१ जूनपर्यंत राज्यात १७२.२ मिमी. म्हणजेच केवळ ६.७७ इंच पाऊस पडला होता.

राज्यात तब्बल ५० टक्के पावसाचा तुटवडा होता; परंतु मागील १५ दिवसांत म्हणजेच २२ जूनपासून ६ जुलैपर्यंत राज्यात एकूण १,०२० मिमी.

म्हणजेच तब्बल ४०.१५ इंच पाऊस बरसला असून पावसाचा तुटवडा तर भरून काढलाच, शिवाय अतिरिक्त ५.८ टक्के पावसाची नोंद झाल्याने राज्यासाठी पाऊस दिलासादायक ठरला आहे. राज्यभर पावसाचे धुमशान सुरू असून पडझड, दरडी कोसळणे आदी घटना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

Monsoon Update
Vishwajit Rane: गोवा दंतवैद्यकीय महाविद्यालयातील 2 परिचारीका निलंबित; आरोग्यमंत्र्यांची कारवाई

काही शाळांकडून शिक्षण खात्याचा आदेश धाब्यावर

राज्यात रेड अलर्टमुळे शाळांना सुटी जाहीर केली असतानाही काही विनाअनुदानित शाळांनी गुरुवारी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. काही ठिकाणी अंगणवाड्याही सुरू होत्या.

त्यामुळे काही अनुचित प्रकार घडला असल्यास त्याला शाळा व्यवस्थापन जबाबदार राहील, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले. हवामान खात्याने गुरुवारी राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता.

त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून शिक्षण संचालकांनी सर्व शैक्षणिक संस्थांना गुरुवारी पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गांना सुटी जाहीर करण्याचा आदेश जारी केला होता. मात्र, काही शाळा या आदेशाचे पालन न करता गुरुवारीही सुरू होत्या.

Monsoon Update
Goa Crime: खूनाच्या प्रयत्नातील 5 जणांना अटक; पर्वरी पोलिसांची कारवाई

वास्को येथील केंद्रीय शाळा गुरुवारी उघडी राहिली आणि तेथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, शाळेतील मुलांना बोलावले नव्हते.

जुने गोवे येथील आणखी एका विनाअनुदानित शाळेच्या सूत्रांनी सांगितले की, ही शाळा सुरू होती आणि विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत हजर झाले.

सांकवाळ येथील एका विनाअनुदानित शाळेतील कर्मचाऱ्याने सांगितले की, गुरुवारी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले नाही. मात्र, शिक्षकांना त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी बोलावले होते.

Monsoon Update
CM Pramod Sawant: 'हॅलो गोयंकार' कार्यक्रम पाहा! नागरीकांच्या तक्रारींचे निरसन करून 15 दिवसांत अहवाल द्या...

मडगाव, केपेत अर्धशतक

मॉन्सूनला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस १,४३७ मिलीमीटर पाऊस मडगाव येथे बरसला असून ५६.५७ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. उशिरा सुरू होऊनही या पावसाने मधल्या काही दिवसांची राहिलेली तूटही भरून काढली आहे.

त्याखालोखाल केपे येथे १,३२२ मिमी. (५२.०५) तर सांगे येथे (५०.२४ इंच) पाऊस पडला. जर पाऊस असाच पडत राहिला तर येत्या दोन दिवसांत म्हापसा, पणजी, मुरगाव आणि दाबोळी येथेही ५० इंचांहून अधिक आकडा पार होण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com