Goa Crime: खूनाच्या प्रयत्नातील 5 जणांना अटक; पर्वरी पोलिसांची कारवाई

संशयित गोवा, कर्नाटक, उत्तर प्रदेशातील
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Police: सावकारीच्या पूर्व वैमनस्यातून एकाच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी गुरुवारी पाच जणांना अटक केली. हे सर्वजण गोवा, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधील आहेत.

पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांनी सांगितले की, कर्नाटकातील खानापूर येथील रहिवासी असलेला शिवाजी खानापूरकर याने 6 जून रोजी याबाबत फिर्याद दिली होती.

Goa Crime
Vishwajit Rane: गोवा दंतवैद्यकीय महाविद्यालयातील 2 परिचारीका निलंबित; आरोग्यमंत्र्यांची कारवाई

त्यात म्हटले होते की, काही अज्ञात लोकांनी त्याच्यावर शस्त्रांनी हल्ला करून त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर केले आणि शरीराच्या इतर भागावरही वार करत गंभीर दुखापत केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक तयार करण्यात आले.

खानापूरकर याच्यावर हल्ला करणाऱ्यांचे कोणतेही वर्णन नव्हते. तथापि, पाळत ठेऊन आणि विश्वसनीय स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी पाच दिवसांत आरोपींची ओळख पटवली, असे गावकर यांनी सांगितले.

झुआरीनगर येथील विशाल राठोड, वास्को येथील खुदबोदिन शेख, कर्नाटकातील मोहम्मद फैजान सय्यद तर शिवा सिंग आणि रिशू सिंग हे दोघे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. या दोघांना मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा येथे पकडण्यात आले.

पाचही जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली शस्त्रे आणि वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Elevated Road
Porvorim Elevated Road
Porvorim Elevated Road Inspection
Srinivas Naik Shooting
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com