Goa CM Pramod Sawant's Hello Goenkar Programme: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या धर्तीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लोकांशी संवाद साधण्यासाठी, लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हॅलो गोंयकार या कार्यक्रमाची सुरूवात केली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी मुख्यमंत्री सावंत राज्यातील जनतेशी संवाद साधतात.
शुक्रवारी, 07 जुलै रोजी हा कार्यक्रम होत आहे. दरम्यान, हा कार्यक्रम सर्व खातेप्रमुखांसह सरकारी अधिकाऱ्यांनी पाहावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हा कार्यक्रम पाहावा, त्यामध्ये लोकांकडून येणाऱ्या शंका, समस्या नोंदवून घेऊन त्यांची स्वेच्छा दखल घेत तक्रारींचे निरसन करावे आणि त्याचा अहवाल 15 दिवसात द्यावा, असेही आदेशात म्हटले आहे.
फोन इन कार्यक्रम असल्याने राज्यातील कोणताही व्यक्ती या कार्यक्रमात फोन करून मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारू शकतो. यासाठी 0832 - 2222424 / 2225204 असे दोन नंबर जारी केले आहेत. या नंबरवर फोन करून कार्यक्रमात सहभागी होता येईल.
दुरदर्शन गोवा चॅनलवर शुक्रवारी सायंकाळी 07 ते 08 या वेळेत हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.