Goa Land Grabbing Case: सुलेमान बेपत्ताच विरोधकांनी केली न्‍यायालयीन चौकशीची मागणी; ज्‍योशुआ यांच्‍या नावावर मुख्‍यमंत्र्यांचे मौन

Goa Politics: भू-बळकाव प्रकरणातील मुख्‍य सूत्रधार सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. प्रकरणाची न्‍यायालयीन चौकशी करा.
Congress state president Amit Patkar
Congress state president Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News: भू-बळकाव प्रकरणातील मुख्‍य सूत्रधार सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. प्रकरणाची न्‍यायालयीन चौकशी करा; तसेच सुलेमानने ज्‍यांची नावे घेतली आहेत, त्‍यांना निलंबित करा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे, तर सरकारने व्‍हिडिओ जारी करण्‍यात सहभागी असलेल्‍यांच्‍या हेतूप्रति शंका व्‍यक्‍त केली आहे.

सुलेमान याचा व्‍हिडिओ व्‍हायरल होताच राज्‍यात खळबळ माजली. पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी ‘सुलेमानला पकडणे हेच आमचे प्रमुख लक्ष्‍य आहे. तसेच त्‍याला पकडताच व्‍हिडिओमागील सत्‍य समोर येईल’, असे स्‍पष्‍ट केले, तर मुख्‍यमंत्री सावंत यांनी ‘चोराच्‍या वक्‍तव्‍यावर विश्‍‍वास ठेवणार का’, असा प्रश्‍‍न करून विरोधकांच्‍या आरोपांकडे काणाडोळा केला आहे. सुलेमानला पोलिस लवकरच गजाआड करतील, असा त्‍यांनी विश्‍‍वास व्‍यक्‍त केला आहे. ज्‍योशुआ यांच्‍यासंदर्भात त्‍यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. दरम्‍यान, व्‍हिडिओ प्रकरण उजेडात आणणारे काँग्रेस (Congress) नेते सुनील कवठणकर यांना उद्या पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.

Congress state president Amit Patkar
Goa Land Grabbing Case: 'चौकशी आयोग हा केवळ फार्स, सरकारने चौकशी भरकटवली'; जमीन हडपप्रकरणी सरदेसाईंचा हल्लाबोल

‘त्‍या’ पोलिसांना निलंबित करा : काँग्रेस

सुलेमानने ज्या पोलिसांची नावे घेतली आहेत, त्या सर्वांना तत्काळ निलंबित करावे. त्याचबरोबर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी सोमवारी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. याशिवाय सुलेमान पलायन प्रकरणामागे पोलिस आणि राजकारण्यांत संगनमत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता यांची उपस्थिती होती. पाटकर यांनी सुलेमान याच्या व्हिडिओवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुलेमान याने आपणास बारा पोलिसांनी कोठडीतून पलायन करण्यास मदत केली, असे सांगून यात त्याने काही अधिकाऱ्यांची स्पष्ट नावे घेतली आहे.

सुलेमान याने ज्यांची नावे घेतलेली आहेत, त्यांना प्रथम पोलिस महासंचालकांनी निलंबित करायला हवे होते. ज्या आमदाराने आपल्या नावे जमीन करण्याची धमकी सुलेमानला दिली, त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली. परंतु पत्रकारांनी त्या आमदाराच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस का करीत नाही, याशिवाय ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी सुलेमान पलायन प्रकरण पूर्णपणे पूर्वनियोजितपणे घडवून आणले आहे काय, अशी विचारणा केली असता त्यावर काँग्रेस नेत्यांनी वेळ मारून नेण्याचे उत्तर दिले.

Congress state president Amit Patkar
Goa Land Grabbing Case: गोव्यातील जमीन हडप प्रकरणी ईडीकडून दोघांना अटक, ED कोठडीत रवानगी

सर्व सीसीटीव्‍ही फुटेज जाहीर करा : आप

पोलिस कोठडीतून दोन पोलिस पथकांच्या मदतीने सुलेमान राज्याबाहेर गेला आहे, हे स्पष्ट होत आहे. त्याशिवाय गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता व इतर अधिकाऱ्यांनी उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्या समोर सुलेमानवर अत्याचार केले, असा आरोप आहे. त्‍यामुळे आरोपांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. कोठडीतून बाहेर पडल्याचा ‘ट्रेलर’ दाखवण्याऐवजी, पोलिस महासंचालकांनी १२ रोजीचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करावे, अशी मागणी ‘आप’च्यावतीने करण्यात आली. आपचे कार्याध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि सरचिटणीस (प्रचार आणि प्रसार) फ्रान्सिस कुएल्हो यांनी पोलिस महासंचालक यांची सोमवारी भेट घेतली आणि फरार असलेल्या सिद्दीकीच्या व्हिडिओतील खळबळजनक आरोपांवर चिंता व्यक्त केली.

...तर अमितने हुबळीतच आत्‍महत्‍या केली असती!

वाल्‍मिकी नाईक म्हणाले, इतरांचे अपराध लपविण्यासाठी अमित नाईकला फसवले आहे, असा त्याच्या कुटुंबीयांचा दावा आहे. अमितला आत्महत्या करायची असती, तर त्याने आत्मसमर्पण केल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न कसा केला?

त्याने हे कृत्य हुबळीमध्येच केले असते. तसेच, पोलिस अमित नाईकच्या वकिलाला आणि कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखत आहेत, जे अधिकाऱ्यांच्या वागण्याबद्दल संशय निर्माण करते.

अमित नाईकवर उपचार सुरूच

जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान हा फरारी होऊन चार दिवस उलटले तरी कर्नाटकात ठाण मांडून बसलेल्या पोलिस पथकाच्या हाती अद्याप ठोस पुरावे लागलेले नाहीत. मात्र, कर्नाटकमधून तो बाहेर जाऊ नये म्हणून कर्नाटक पोलिसांच्या मदतीने पळवाटांवर नजर ठेवली जात आहेत.

संशयित अमित नाईक हा सध्या गोमेकॉ इस्पितळात उपचार घेत आहे, तर दुसरा संशयित हजरतसाब अली हा सुलेमानच्या ओळखीचा टॅक्सीचालक असून वेळोवेळी प्रवासावेळी त्याची मदत घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Congress state president Amit Patkar
Goa Land Grabbing Case: जमीन हडप चौकशीत 47 पैकी 2 प्रकरणे बंद

व्‍हिडिओ ज्‍याला मिळाला, त्‍याची आधी चौकशी : मुख्‍यमंत्री गरजले

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, सुलेमान महमद खान ऊर्फ सिद्दीकी पलायन प्रकरणाचा तपास झाल्यावर संशयाची सुई भलत्यांकडेच वळलेली असेल.

ध्वनिचित्रफीत कोणाला कोणी पाठवली याचाही तपास केला जाणार आहे. सिद्दीकीला बळीचा बकरा ठरवला जात आहे असे म्हणणाऱ्यांनी साडेचार वर्षे बेपत्ता असलेल्या सिद्दीकीला पकडला, तेव्हा पोलिसांचे साधे अभिनंदनही केले नव्हते.

सिद्दीकीची बेकायदा मालमत्ता जमीनदोस्त केली, तेव्हा सरकारच्या कारवाईचे समर्थन या लोकांनी केले नव्हते. आता त्याला पुन्हा पकडले जाईल तेव्हाच अनेकांचा भांडाफोड होणार आहे.

सिद्दीकीचा व्हिडिओ आताच कसा काय आला याचाही आम्ही शोध घेणार आहोत. हा व्‍हिडिओ ज्‍याला मिळाला, त्‍याची सर्वात आधी चौकशी होणार.

सुलेमानबाबत डीजीपींनी दिलेली माहिती योग्‍य आहे. चोर बाहेर पडण्‍यासाठी काहीही आरोप करतो

नाहक त्रास देण्‍याचा प्रयत्‍न : गिरीश

काँग्रेस नेते सुनील कवठणकर यांना पोलिसांनी चौकशीसाठी मंगळवारी सकाळी १० वाजता रायबंदर येथे बोलावले आहे. यावेळी त्‍यांची कसून चौकशी होईल. दरम्‍यान, कवठणकर यांना सरकारी यंत्रणेकडून त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. अशा कृत्याचा आपण निषेध करीत असल्याचे काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com