Murder Case: बस कंडक्टरला माहिती देणे पडले महाग!

म्हापसा पोलिसांचा ससेमिरा माझ्या मागे लागला. पोलिसांमुळेच मी आपल्या नोकरीला मुकलो
Murder Case
Murder CaseDainik Gomantak

राज्यात (Goa) गाजत असलेल्या तरूणीच्या मृत्यू (Murder Case) प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळे वळण लागत आहे. तिच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. पोलिस (Goa Police) पुराव्यांच्या शोधात आहेत, तर दुसरीकडे, तीची माहिती तिच्या वडिलांना सांगणाऱ्या एका खासगी बसवाहकावर (Bus conductor) आपली नोकरी (Job) गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तो सध्या बेरोजगार झाला असून पोलिसांना केलेले सहकार्य आपल्याला महागात पडल्याचे त्याचे म्हणणे आहे. या वाहकाने ‘गोमन्तक’कडे आपली व्यथा सांगितली.

Murder Case
Murder Case: हा तर नियोजित हल्ला? कुटुंबियांना ‘पोस्टमॉर्टम रिपोर्ट’ का दिला नाही?

सकाळी तरूणीच्या भ्रमिष्टावस्थेत म्हापसा येथील कदंब बसस्थानकाच्या दहा नंबर फलाटावर होती. एकेकाळी तिचा वर्गसाथी असलेल्या खाजगी बसवाहकाची नजर तिच्यावर पडली. यावेळी तीने मास्क खाली करताच मी तिला ओळखले होते. शिवोली ते मोरजीकडे जाणाऱ्या बसगाड्यांच्या फलाटावर ती दोन्ही हात एकमेकांत गुंडाळून उभी होती. त्यानंतर ती कुठे गेली याची माहिती मला नाही. मी गेली अनेक वर्षांपासून तिच्या संपर्कात नव्हतो. आम्ही पाचवी, सहावी वर्गमित्र होतो. ती जरा खोडकर आणि मनमिळाऊ स्वभावाची होती. ती आत्महत्या करेल, असे मला वाटत नाही. ती म्हापशात असल्याची माहिती आपण फोनवरून तिच्या वडिलांना दिली. त्यानंतर म्हापसा पोलिसांचा ससेमिरा आपल्या मागे लागला. पोलिसांमुळेच आपण आपल्या नोकरीला मुकलो, असेही या वाहकाने सांगितले.

Murder Case
Murder Case: तरूणीच्या कुटुंबियांसह हळदोण्यात हजारो लोक रस्त्यावर

गूढ कधी उकलणार?

सिद्धीचे पालक व कुटुंबीय वारंवार दिलेले स्टेट्समेंट बदलत असल्याने तपासाची दिशा भरकटत चालल्याचे पोलिस यंत्रणांचे म्हणणे असून येत्या एक दोन दिवसांत या मृत्यूचे गूढ जगासमोर येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com