Goa mining: 'RKB'ला 7 पैकी 3 खाण डंप; आणखी 13 डंपचा पुढील आठवड्यात होणार ई-लिलाव

Goa Mining E Auction: राज्‍यातील खाण उद्योगाला चालना देण्‍यासाठी खाण खात्‍याने खाण पट्ट्यांप्रमाणेच डंपचाही ई-लिलाव करण्‍याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी सुरू केलेली होती
Goa Mining E Auction
Goa miningDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: खाण खात्‍याने डंपच्‍या प्रत्‍यक्ष ई-लिलावास सुरवात केली असून, पहिल्‍या सात डंपसाठी जो ई-लिलाव झाला, त्‍यातील तीन डंप ‘आरकेबी ग्‍लोबल’ कंपनीने जिंकले आहेत. यापुढे ८ जुलै रोजी सात, तर १६ जुलै रोजी सहा डंपचा ई-लिलाव होणार आहे.

राज्‍यातील खाण उद्योगाला चालना देण्‍यासाठी खाण खात्‍याने खाण पट्ट्यांप्रमाणेच डंपचाही ई-लिलाव करण्‍याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी सुरू केलेली होती. या डंपसाठी एकूण ५९ बोली लावण्‍यात आलेल्‍या होत्‍या. त्‍यांच्‍याकडून सविस्‍तर प्रकल्‍प अहवाल (डीपीआर) घेऊन आणि त्‍यांची छाननी करून खात्‍याने काही दिवसांपूर्वी विविध भागांतील सात डंपच्‍या ई-लिलावाची प्रक्रिया पार पाडली.

Goa Mining E Auction
Mining Transport: धूळ, चिखल आणि रात्रीची धडधड! पावसाळ्यात खनिज वाहतूक बंद करा; पिळगावच्या सारमानस भागातील नागरिकांचा एल्गार

त्‍यातील तीन डंप ‘आरकेबी ग्‍लोबल’ कंपनीला मिळाले आहेत, अशी माहिती खाण संचालक नारायण गाड यांनी दिली. ‘येत्‍या ८ जुलै रोजी आणखी सात, तर १६ जुलै रोजी सहा डंपचा लिलाव करण्‍यात येणार आहे. पहिल्‍या टप्‍प्‍यात ज्‍या सात डंपचा लिलाव झाला, त्‍यासाठी राखीव किंमत २२ टक्‍के इतकी ठेवण्‍यात आली होती.

तर, या डंपवर ११.०२ दशलक्ष टन खनिज माल होता. डंप लिलाव जिंकणाऱ्या कंपन्‍यांकडून सुरवातीला एकरकमी २०० कोटी रुपये घेण्‍यात येतील. प्रत्‍यक्ष डंप सुरू झाल्‍यानंतर त्‍यातील माल संपेपर्यंत सरकारच्‍या तिजोरीत हजारो कोटींचा महसूल जमा होईल, असेही गाड यांनी स्‍पष्‍ट केले.

Goa Mining E Auction
Mining: सिंधुदुर्गातील 'ते' खनिज गोव्यात? उपग्रह छायाचित्रांच्या आधारे तक्रार, चौकशीची मागणी

‘डंप’ मिळालेल्या कंपन्या

ठिकाण माल (दशलक्ष टन) जिंकलेली कंपनी

कष्टी-सांगे ६.१५ गोवा स्‍पंज

सांतोना-सांगे २.१२ वेस्‍टवॉल रिसोर्सीस

साकोर्डा-धारबांदोडा ०.७१ बी.जी. असोसिएट

कोळंब-सांगे ०.३५ आरकेबी ग्‍लोबल

कोळंब-सांगे ०.१३ आरकेबी ग्‍लोबल

कोळंब-सांगे १.३२ सतीश शुगर

कुरपे-सांगे ०.२४ आरकेबी ग्‍लोबल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com