

डिचोली: पिळगावच्या सारमानस भागातील नागरिकांनी पावसाळ्यात खनिज वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी खनिज वाहतूक रोखून धरली. खाण कंपनीच्या फाटकासमोर ट्रक अडविल्याने सकाळपासून वाहतूक ठप्प झाली.
धूळ प्रदूषण, पावसाळ्यातील चिखल, रात्रीची धडधड आणि सुरक्षेच्या प्रश्नांमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. माजी सरपंच महेश वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महिलांचाही सहभाग होता.
ट्रकमालकांच्या विनंतीनंतर आंदोलकांनी खनिजाने भरलेले ९४ ट्रक जेटीवर जाण्यास परवानगी दिली. दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी (ता.१७) दुपारी ३.३० वा. डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.