Mining: सिंधुदुर्गातील 'ते' खनिज गोव्यात? उपग्रह छायाचित्रांच्या आधारे तक्रार, चौकशीची मागणी

Illegal Soil Mining Sindhudurg Goa: खनिजयुक्त मातीचे बेकायदा उत्खनन करून ती गोव्यात पाठवली जात असल्याचा गंभीर आरोप पर्यावरणवादी नेते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
Illegal Soil Mining Sindhudurg Goa
MiningDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळवणे-कोंडुरा परिसरातून मोठ्या प्रमाणावर खनिजयुक्त मातीचे बेकायदा उत्खनन करून ती गोव्यात पाठवली जात असल्याचा गंभीर आरोप पर्यावरणवादी नेते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.

गुगल अर्थवरील उपग्रह छायाचित्रांचा आधार घेत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन, खनिकर्म विभाग आणि महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Illegal Soil Mining Sindhudurg Goa
Pisurle Mineral Block: पिसुर्ले खाण लिलाव प्रक्रियेत 'जेबीआर स्टोन'ची एन्ट्री; हायकोर्टाचा मोठा निकाल; तांत्रिक बिघाडामुळे रखडलेली निविदा स्वीकारण्याचे खाण संचालकांना आदेश

डॉ. परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून कुडाळ तालुक्यातील झाराप रेल्वे स्थानकावरून मोठ्या प्रमाणावर खनिजसदृश माती वास्को (गोवा) येथे रेल्वेमार्गे पाठवली जात आहे.

या मातीचा उगम नेमका कुठे आहे आणि तिचे उत्खनन कायदेशीर पद्धतीने करण्यात आले आहे का? याबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत. सुरवातीला ही माती आडाळी परिसरातील असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, गुगल अर्थच्या सॅटेलाईट छायाचित्रांच्या पाहणीत तळवणे-कोंडुरा परिसरातील डोंगर मोठ्या प्रमाणावर पोखरण्यात आल्याचे दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Illegal Soil Mining Sindhudurg Goa
Goa Mining: '..अन्यथा खाणपट्टा बोलीला फटका'! निर्यातदार संघटनेचा इशारा; लोहखनिज निर्यातीवर शुल्क जाचक असल्याचा दावा

त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दहा ते बारा दिवसांत झाराप रेल्वे स्थानकावरून आठ ते दहा मालगाड्या भरून ही माती गोव्यात पाठविण्यात आली आहे. या वाहतुकीसाठी दररोज सुमारे ५०० हून अधिक डंपर्सचा वापर होत असल्याचे सांगितले जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असताना संबंधित विभागांना याची माहिती नसणे अशक्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

आरोपांतील प्रमुख मुद्दे!

तळवणे-कोंडुरा परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याचा दावा .गुगल अर्थच्या सॅटेलाईट छायाचित्रांत डोंगर पोखरल्याचे दिसत असल्याचा आरोप .झाराप रेल्वे स्थानकावरून १० ते १२ मालगाड्यांमधून माती गोव्यात पाठवल्याचा दावा.दररोज ५०० ते ६०० डंपर्सद्वारे वाहतूक होत असल्याचा उल्लेख.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com