Metro In Goa: गोव्यात मेट्रो कधी धावणार? मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर

Goa Transportation News : मुख्यमंत्र्यानी गोव्यात लवकरच सुरु होणाऱ्या मेट्रोच्या प्रकल्पाकडे लक्ष वेधलं
CM Dr. Pramod Sawant
CM Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Panaji News: युवा दिवसाच्या निमिताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तरुणांशी संवाद साधला. पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यानी गोव्यात लवकरच सुरु होणाऱ्या मेट्रोच्या प्रकल्पाकडे लक्ष वेधलं. गोव्यात यापूर्वी देखील मेट्रोचा प्रकल्पाची चाचणी प्रक्रिया झाली होती, मात्र काही कारणास्तव तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला नव्हता.

आजच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यानी गोव्यातील मेट्रोचा प्रकल्प सध्या दुसऱ्या टप्प्यावर असल्याची माहिती दिली. सध्या गोव्यातील मेट्रोचा प्रकल्पाबद्दलची चर्चा सुरु आहे. गोवा सरकारकडून हा प्रकल्पाबद्दलचे प्रपोजल तयार आहे आणि याबद्दल लवकरच भारतीय रेल्वेशी चर्चा सुरु असल्याने येणाऱ्या काळात मेट्रोचा प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती दिली.

“राजकारणात उतरा आणि समाजाचे नेतृत्व करा"

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी पणजीत झालेल्या युवा संमेलनात तरुणांना राजकारणात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. राष्ट्रनिर्माणात तरुण पिढीचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी समाजातील नेतृत्वाच्या पोकळीवर भर दिला.युवा नेत्यांच्या संमेलनात बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, “आपल्या समाजात नेतृत्वाची मोठी उणीव आहे. सर्व स्तरांवर आपल्याला नेतृत्वाची गरज आहे आणि म्हणून तरुणांनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”

मुख्यमंत्री सावंत यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, डॉक्टर म्हणून नोकरी करत असताना त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही आणि पुढे सभापती आणि नंतर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली.

CM Dr. Pramod Sawant
CM Pramod Sawant: खुशखबर! गोव्यात मिळणार 150 ठिकाणी मोफत ‘वायफाय’ सुविधा

युवकांना सल्ला देताना सावंत म्हणाले, “तुमच्या क्षमतांची ओळख पटवून घ्या आणि त्या क्षमतांचा उपयोग विकसित भारतासाठी करा. संधी काही सतत येत नाहीत, त्यामुळे प्रत्येक उपलब्ध संधीचा फायदा करून घ्या.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Pramod Sawant MGP Political Limits
Delhi Metro Viral Video
Digambar Kamat Water Metro
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com