CM Pramod Sawant: गोव्यात लवकरच 'स्वतंत्र' पोस्टल सर्कल! टपाल अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची घोषणा

Postal Service Employees Association Convention: लवकरच गोव्यात स्वतंत्र पोस्टल सर्कल स्थापन करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी प्रयत्नही चालू आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantX
Published on
Updated on

CM Pramod Sawant About Seperate Postal Circle For Goa

डिचोली: आजच्या काळातही टपाल सेवेचे महत्त्व कमी झालेले नाही. बँका आदी वित्त संस्थांकडून फसवणुकीचे प्रकार वाढत असले, तरी टपाल ही अजूनही एक विश्वासू सेवा म्हणून ओळखण्यात येते. लवकरच गोव्यात स्वतंत्र पोस्टल सर्कल स्थापन करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी प्रयत्नही चालू आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

अखिल भारतीय टपाल सेवा कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाला मुळगाव येथे आजपासून (मंगळवारी) उत्साहात प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.

CM Pramod Sawant
Goa AAP: ..तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही! Cash For Job वरुन 'आप' कार्याध्यक्षांचा इशारा

यावेळी आयोजकांतर्फे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र आणि गोवा टपाल सर्कलचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, पोस्टमास्टर महानिरीक्षक अमिताभ सिंग, भारतीय रेल टपाल कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस अनंतजी पाल, भारतीय मजदूर संघाचे के. प्रकाश आदी पदाधिकारी उपस्थित होते. अनंत पाल यांनी बोलताना संघटना स्थापन करण्यामागील हेतू आणि महत्व स्पष्ट केले. उद्‍घाटन सत्रानंतर मान्यवरांनी उपस्थित प्रतिनिधीना मार्गदर्शन करताना संघटनेची ध्येयधोरणे स्पष्ट केली. मुळगावच्या श्री धाकटी वनदेवी संस्थान सभागृहात चालू असलेल्या या अधिवेशनाला देशभरातून मिळून तीनशेहून अधिक प्रतिनिधींनी उपस्थिती लावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com