Goa Medical College: गोमेकॉत एमबीबीएसच्‍या आणखी ५० जागांची मोठी भर! 'एनएमसी'कडून अधिकृत मंजुरी; आता गोव्यात वर्षाला 250 'डॉक्टर' घडणार

Goa Medical College MBBS Seats: राष्‍ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्‍पितळासाठी (गोमेकॉ) एमबीबीएसच्‍या ५० अतिरिक्त जागांना मंजुरी दिली आहे.
Goa Medical College MBBS Seats
Goa Medical CollegeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राष्‍ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्‍पितळासाठी (गोमेकॉ) एमबीबीएसच्‍या ५० अतिरिक्त जागांना मंजुरी दिली आहे. त्‍यामुळे २०२६-२७ च्‍या शैक्षणिक वर्षापासून गोमेकॉतील वार्षिक प्रवेश क्षमता २०० वरून २५० पर्यंत वाढणार आहे. याबाबत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘एनएमसी’चे आभार मानले आहेत.

वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा द्यावी लागते. यंदा ही परीक्षा प्रथम ३ मे रोजी घेण्‍यात आली होती. परंतु, परीक्षेचे पेपर फुटल्‍याचे समोर आल्‍यानंतर देशभर गदारोळ माजला. त्‍यामुळे ही परीक्षा २१ जून रोजी नव्‍याने घेण्‍यात आली.

Goa Medical College MBBS Seats
Goa Medical College Contract Workers: ‘गोमेकॉ’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांची नोकरीत कायम करण्याची मागणी; 12 वर्षांपासून सेवा बजावणाऱ्यांचे सरकारला निवेदन

या परीक्षेला देशभरातून २२.७९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गोव्‍यातील ४३७१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्‍यात उत्तर गोव्‍यातील ३३५४ आणि दक्षिण गोव्‍यातील १०१७ विद्यार्थ्यांचा समावेश होता. परीक्षेचा निकाल येत्‍या २० जुलैपर्यंत येण्‍याची शक्‍यता असून, त्‍यानंतर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

दरम्‍यान, यापूर्वी गोमेकॉत २०० पैकी १७० जागा स्‍थानिकांना मिळत होत्‍या. आता विविध जातींसाठीही आरक्षण असल्‍याने राज्‍यातील विद्यार्थ्यांना यंदा २१२ जागा मिळणार आहेत. ८५ टक्‍के जागा स्‍थानिकांसाठी गोमेकॉत वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी एकूण जागांपैकी ८५ टक्के जागा गोव्‍यातील आणि १५ टक्के जागा अखिल भारतीय कोट्यासाठी राखीव असतात. ८५ टक्के राज्य कोट्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे गोव्यात किमान दहा वर्षे सलग वास्‍तव्‍याचे किंवा शिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे.

Goa Medical College MBBS Seats
Goa Medical College: सरकारचे वैद्यकीय शिक्षणात महत्त्वाचे पाऊल; आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत: मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोमेकॉसाठी ५० अतिरिक्त जागांना मंजुरी देण्‍याच्‍या ‘एनएमसी’च्‍या निर्णयामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना, विशेषतः गोव्यातील तरुणांना अधिक संधी उपलब्ध होतील. शिवाय गोव्याची वैद्यकीय शिक्षण व्यवस्था व आरोग्यसेवा अधिक सक्षम होईल. राज्यातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी सातत्याने सहकार्य केल्याबद्दल ‘एनएमसी’चे आभार.

– डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Congress Kushavati district
Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Student Protest Against Exam System
Goa CM Pramod Sawant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com