Goa Medical College: सरकारचे वैद्यकीय शिक्षणात महत्त्वाचे पाऊल; आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत: मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Dental College Admission: सरकारने राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजेच ईडब्‍ल्यूएस गटातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
ews students fee discount in goa medical colleges
ews students fee discount in goa medical collegesDainiak Gomantak
Published on
Updated on

पणजी: सरकारने राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजेच ईडब्‍ल्यूएस गटातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि गोवा दंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या ईडब्‍ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक शुल्कात सवलत मिळणार आहे. ही सवलत अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतींच्या धर्तीवरच लागू असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे.

या संबंधीचे पत्रक आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव प्रणव भट यांनी जारी केले आहे.या निर्णयामुळे ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांनाही एससी आणि एसटी विद्यार्थ्यांप्रमाणेच शुल्क सवलतीचा लाभ घेता येईल. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचे वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहू नये, हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.

ews students fee discount in goa medical colleges
Goa CM Pramod Sawant: सोने खरेदीवर संयम ठेवा! लोकांनी पंतप्रधान मोदींचे आवाहन गांभीर्याने घ्यावे - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

या निर्णयामुळे राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि उच्च शिक्षण घेणे अधिक सुलभ होणार आहे.सरकारने राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजेच ईडब्‍ल्यूएस गटातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि गोवा दंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या ईडब्‍ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक शुल्कात सवलत मिळणार आहे. ही सवलत अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतींच्या धर्तीवरच लागू असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. या संबंधीचे पत्रक आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव प्रणव भट यांनी जारी केले आहे.

ews students fee discount in goa medical colleges
CM Pramod Sawant: "गोवा परप्रांतीयांची 'दुबई' होऊ देऊ नका!" मुख्यमंत्री सावंतांचे युवकांना आवाहन; राज्य-केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीचा हात

आमचे सरकार प्रत्येकासाठी परवडणारे आणि सर्वसमावेशक वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना कोणत्याही आर्थिक ओझ्याशिवाय आपली शैक्षणिक स्वप्ने पूर्ण करता येतील आणि ते राज्याच्या प्रगतीत योगदान देऊ शकतील.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com