अय्‍यांनी खडक फोडून आणले पाणी; देशभरात गाजली जिद्दीची कहाणी! 'मन की बात'मध्‍ये पंतप्रधान मोदी यांच्याकडून कौतुक

Balkrishna Ganesh Ayya Loliem: उच्‍च विचारसरणी बाळगणारे अय्‍या यांचे कार्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधानांनी काढले.
Balkrishna Ganesh Ayya Loliem
Balkrishna Ganesh Ayya LoliemDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण : अभियंत्‍यांनी खडकाळ जमीन म्‍हणून नाकारले, तिथेच कोणतीही सरकारी मदत न घेता, निवृत्तीनंतर मिळणाऱ्या वेतनामधून विहीर खोदून स्‍वत:चेच नव्‍हे तर आजूबाजूच्‍या २५ कुटुंबांचे पाण्‍याचे दुर्भीक्ष दूर करणाऱ्या लोलये येथील बाळकृष्‍ण गणेश अय्‍या (७७) यांच्‍या कार्याची देशभर चर्चा सुरू आहे. होय! ‘मन की बात’च्‍या १३४व्‍या भागात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अय्‍या यांच्‍या जिद्द, चिकाटी, दूरदृष्‍टी व सामाजिक दायित्‍वाचे आज कौतुक केले आणि समस्‍त गोमंतकीयांचा ऊर अभिमानाने भरून आला.

Balkrishna Ganesh Ayya Loliem
Bicholim Water Issue: डिचोली पाणीपुरवठा कार्यालयावर धडक; गृहिणी संतप्त: सावरधाटमध्ये पाणी संकट, तोडगा काढण्याचे आश्‍वासन

साधी राहणी, उच्‍च विचारसरणी बाळगणारे अय्‍या यांचे कार्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधानांनी काढले. काणकोण तालुक्‍यातील लोलये गावात जेव्‍हा चापोली‌ धरणातून पाण्याचा‌ पुरवठा होत नव्हता, त्यावेळी पंचायत क्षेत्रात नव्यानेच वसविलेल्या माड्डीतळप येथील रहिवाशांना कातळात ४० फूट खोल अनोखी विहीर खोदून पाणी पुरवठा करण्याची किमया बाळकृष्ण अय्या यांनी केली. अय्‍या हे चित्रकार व मूर्तिकारही आहेत. ते मूळ शेळी येथील रहिवासी. तेथून ते माड्डीतळप येथे स्थलांतरित झाले. मड्डीतळप म्‍हणजे पाण्याचा टंचाई असलेला खडकाळ भाग. तेथे पाणी नव्‍हते. अय्‍या यांनी जागा विकत घेऊन आणखी एक‌ विहीर खोदली व स्वखर्चाने जलवाहिनी घालून पाणी पुरवठा केला आणि हे विरळा उदाहरण ठरले.

अष्‍टपैलू व्‍यक्‍तिमत्त्‍व

अय्‍या हे अष्‍टपैलू व्‍यक्‍तिमत्त्‍व आहे. त्‍यांनी वेगवेगळ्या देवालयांच्या शिखर कलशावर अष्टदिक्पाल मूर्तीही ‌बनवून बसविल्या आहेत. ते पैंगीण येथील श्री श्रद्धानंद विद्यालयात चित्रकला शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. ते कृषी क्षेत्रातही कार्यरत आहेत. कलमे करण्यात त्यांचा हातखंडा आहे. आज काणकोण तालुक्यात त्यांनी केलेली कलमे फळे देत आहेत.

Balkrishna Ganesh Ayya Loliem
Goa Dam Water Level: राज्यातील चार धरणांमधील पाणीसाठा 35 टक्‍क्‍यांखाली, मान्‍सूनपूर्व पाऊसही मंदावला; शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

काणकोणात आनंद

पंतप्रधान मोदींनी अय्‍या यांचे कौतुक केल्‍याचे कळताच काणकोणवासीयांच्‍या आनंदाला पारावार उरला नाही. अनेकांनी त्‍यांच्‍या घरी फोन केले.

माननीय पंतप्रधानांनी बाळकृष्ण अय्या यांची प्रेरणादायी कहाणी देशवासीयांसमोर आणली. त्यांचे हे कार्य लोकसहभाग व नि:स्वार्थ सेवेच्या माध्यमातून तळागाळातील परिवर्तनाचा एक देदीप्यमान आदर्श ठरतो. गोव्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

- प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Tillari Water Diversion
Canacona Water Supply
Subhash Shirodkar Water Management
Goa Karnataka Water Dispute
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com