Vasco: हायवेवरील खोदकाम मुरगावच्या माजी नगराध्यक्षांनी पाडले बंद

कंत्राटदाराविरोधात तक्रार दाखल करणार
Vasco news
Vasco newsDainik Gomantak
Published on
Updated on

Vasco News: वास्को मुंडवेल येथून सार्वजनिक बांधकाम पाणी विभागाच्या कामासाठी सुरू असलेले कायदेशीर परवानगी नसताना राष्ट्रीय महामार्गावर खोदकाम केल्याप्रकरणी मुरगावचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी काम बंद पाडले.

बार्देश येथील कंत्राटदार ‘केपीएम’ने रस्ता खोदकामाची परवानगी नसताना रस्ता खोदून गुन्हा केल्याचे राऊत यांनी सांगितले.

मुंडवेल कदंबा बसस्थानकाजवळ बेकायदेशीररित्या रस्ता व पदपथ खोदल्याने सार्वजनिक बांधकाम पाणी विभागाच्या संबंधित अधिकारी व कंत्राटदाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी गेल्या आठवड्यात मुंडवेल ते गोवा शिपयार्ड कंपनी पर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाच्या वाहिनीच्या कामाचा शुभारंभ केला होता.

परंतु आमदाराने स्थानिक नगरसेविकेला विश्वासात न घेता, त्यांच्या प्रभागातून जलवाहिनी घालण्याचे काम हाती घेतले आहे.

Vasco news
Farhan Akhtar at Goa: 'दिल चाहता है' नंतर 23 वर्षांनी फरहान अख्तर गोव्यातील शापोरा किल्ल्यावर...

मुंडवेल, व्होळांत,भोवतेर व गोवा शिपयार्ड परिसरातील घरांना सा.बां. विभागाचा पाणी पुरवठा खूपच कमी प्रमाणात होत आहे. स्थानिकांच्या गरजा भागवण्यात सरकारला वेळ नाही.

मात्र, गोवा शिपयार्ड कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभाग चक्क 250 मिमी. जलवाहिनी बसवून देत असल्याचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी सांगितले.

प्रभाग 15 मध्ये खूपच कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असताना, स्थानिक लोकप्रतिनिधी गोवा शिपयार्डच्या गरजा भागवत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

दरम्यान, रविवार (दि.10) सुट्टीचा दिवस असताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कंत्राटदाराने वास्को मुंडवेल येथील पदपथ व राष्ट्रीय महामार्ग खोदण्यास सुरुवात केली.

गॅसवाहिनीचेही बंद पाडले होते काम

वास्को मुंडवेल भागात अदानी ग्रुपच्या गॅस वाहिनीचे कामही पूर्णपणे बेकायदेशीर असल्याची माहिती राऊत यांनी दिली.सदर गॅस वाहिनीसाठी रस्ता व पदपथ खोदण्यास परवानगी नसताना, वास्को मुंडवेल येथे खोदकाम करण्यात आले होते.

नंतर गॅस वाहिनीच्या कंत्राटदाराने काम बंद केले. गॅस वाहिनी व जलवाहिनी बसविताना संबंधिताने रितसर कागदपत्रे सादर केली नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

Vasco news
CM Pramod Sawant: सरकारी नोकरीसाठी अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट आवश्यक; मुख्यमंत्र्यांची माहिती

कंत्राटदाराकडे कागदपत्रे नसल्याचे उघड

रस्त्यावर खोदकाम चालल्याचे पाहून माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी कंत्राटदाराला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची परवानगी असलेले कागदपत्र दाखवण्यास सांगितले. कंत्राटदाराने खोदकामाची परवानगी नसल्याचे सांगितले.

नंतर राऊत यांनी सार्वजनिक बांधकाम पाणी विभागाच्या तांत्रिक सहाय्यक विशांत नाईक यांना फोन केला असता, त्यांनीही परवानगी नसल्याचे राऊत यांना सांगितले.

अखेर कंत्राटदाराने काम बंद करून रस्ता पूर्ववत बुजवला.याप्रकरणी संबंधित कंत्राटदार व ‘साबांखा’ पाणी विभागाच्या विरोधात सोमवारी वास्को पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com