Goa Maharashtra Border: भाजीच्या कॅरेटमध्ये लपवून गोव्यातून सिंधुदुर्गात अवैध दारू वाहतूक; 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Goa Illegal Liquor Seized: गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि इन्सुली तपासणी नाका पथकाकडून बुधवारी (२ एप्रिल) मोठी कारवाई करण्यात आलीय.
Goa Illegal Liquor Seized
Goa Illegal Liquor SeizedDainik Gomantak
Published on
Updated on

बांदा: गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि इन्सुली तपासणी नाका पथकाकडून बुधवारी (२ एप्रिल) मोठी कारवाई करण्यात आलीय. या कारवाईत तब्बल १३ लाख ३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

दारूचे ६४ बॉक्स

राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि इन्सुली तपासणी नाक्याच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. बांदा ओटवणे रोडवर अवैध दारू वाहतुकीच्या संशयित वाहनांची तपासणी करीत असताना महिंद्रा बोलेरो पिकअप कारची तपासणी केली. या कारमध्ये भाजीच्या रिकाम्या कॅरेटच्या खाली लपवून ठेवलेले अवैध दारूचे ६४ बॉक्स आढळून आले.

Goa Illegal Liquor Seized
Goa Politics: 'परस्परांना अडचण नको'चा सूर! ढवळीकरांची दामू नाईकांशी चर्चा; सदिच्छा भेट असल्याचा केला दावा

१३ लाख ३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत ६ लाख ८३ हजार ६४० रुपयांची दारू, ६ लाख रुपयांची महिंद्रा बोलेरो पिकअप, अंदाजे २० हजार रुपयांचे भाजीचे रिकामे कॅरेट असा एकूण १३ लाख ३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शंकर दत्तात्रय मस्के (वय ४३) व सचिन शिवाजी वाघमारे (वय २७, रा. बोरामणी, जि. सोलापूर) या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय.

Goa Illegal Liquor Seized
Goa University: स्थानिकांच्या आक्षेपानंतर गोवा विद्यापीठाची माघार! बाहेरील विद्यार्थ्यांचे आरक्षण जुन्या नियमानुसार

अवैधरित्या दारू वाहतूक

राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्गचे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली भानुदास खडके, निरीक्षक प्रदीप रास्कर, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, तसेच रणजीत शिंदे, अभिषेक खत्री, सागर सूर्यवंशी, सतीश चौगुले यांच्या पथकानं ही कारवाई केली.

गोव्यातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध दारू वाहतूक केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने तपासणी आणि कारवाई अधिक तीव्र केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com