Goa University: स्थानिकांच्या आक्षेपानंतर गोवा विद्यापीठाची माघार! बाहेरील विद्यार्थ्यांचे आरक्षण जुन्या नियमानुसार

Goa University Reservation: विद्यापीठाने यासंबंधी स्पष्टीकरण देताना म्हटले, की तीन दशकांपूर्वी गोवा विद्यापीठातील एका अभ्यासक्रमात १५ ते ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा.
Goa University Paper Leak Scam
Goa University NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Reservation rules for outside students in Goa colleges

पणजी: गोवा विद्यापीठ तसेच संलग्न महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमात राज्याबाहेरील विद्यार्थ्यांच्या प्रवेश कोट्यात प्रत्येक अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागांमध्ये यंदापासून दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु विद्यापीठाच्या या निर्णयामुळे स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप होऊ लागल्याने यावर्षीच्या सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये जुन्या नियमानुसार किमान २ जागा राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे विद्यापीठाने कळविले आहे.

बाहेरील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे कठीण होणार आहे. सर्वाधिक एमएससी रसायनशास्त्र विभागात गोव्याबाहेरील १० विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात आले असल्याने गोव्यासारख्या एकमेव विद्यापीठ असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना फटका बसेल, असा आक्षेप घेण्यात आला; परंतु विद्यापीठाने यासंबंधी स्पष्टीकरण देताना म्हटले, की तीन दशकांपूर्वी गोवा विद्यापीठातील एका अभ्यासक्रमात १५ ते ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा.

Goa University Paper Leak Scam
Goa University: गोवा विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांचा कोटा वाढला; स्थानिकांच्या जागा धोक्यात?

त्यावेळी १० टक्क्यांच्या नियमाप्रमाणे कमाल २ बाहेरील विद्यार्थ्यांसाठी जागा आरक्षित होत्या; परंतु आता विद्यार्थ्यांना प्रवेश मर्यादा वाढविली आहे. रसायनशास्त्र अभ्यासक्रमात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यानुसार १० टक्के बाहेरील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात येणार होते. सर्वसमावेशकता आणि विविधता सांभाळण्यासाठी ‘नॅक’च्या नियमाप्रमाणे ते जरूरीचे आहे; परंतु सध्या या निर्णयामुळे संभ्रम निर्माण झाल्याने यंदा जुन्या नियमाप्रमाणे प्रत्येक विषयात कमाल २ बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, असे गोवा विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

Goa University Paper Leak Scam
Goa University: पेपरचोरी प्रकरणातील प्राध्यापकावर कारवाई होणार! कार्यकारी परिषदेकडून शिक्कामोर्तब; पोलिसांकडूनही चौकशी सुरू

आरक्षणावर प्रभाव नाही

गोव्यातील जे विद्यार्थी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयाव्यतिरिक्त इतर भारतीय विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतात, ते या विभागातून आरक्षण मिळवू शकतात. तसेच ज्या बाहेरील विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव आहेत त्या रिक्त राहिल्यास त्या जागांवर सर्वसामान्य गटातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. या बदलाचा इतर आरक्षणावर अजिबात प्रभाव पडणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com