Goa Politics: 'परस्परांना अडचण नको'चा सूर! ढवळीकरांची दामू नाईकांशी चर्चा; सदिच्छा भेट असल्याचा केला दावा

BJP MGP Alliance: दोन्ही नेत्यांनी ही सदिच्छा भेट होती असे म्हटले असले तरी आताच सदिच्छेची गरज का भासली याची चर्चा सुरू झाली आहे.
Damu Naik, Deepak Dhavalikar
Damu Naik, Deepak DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

Deepak Dhavalikar Damu Naik Meeting

पणजी: भाजप आणि मगोप यांनी संघटनात्मक काम करताना दोन्ही पक्षांनी परस्परांना अडचण होईल, अशा कृती करू नयेत यावर आज एकमत झाले. ‘मगो’चे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिल्ली दौऱ्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर ऊर्फ दामू नाईक यांची भाजप कार्यालयात जाऊन भेट घेतली.

त्यावेळी यावर चर्चा झाली. दिल्ली दौऱ्यात दोनच दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांची भेट घेतली. पक्षश्रेष्ठींचा संदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंत पोचवला असल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी म्हटले होते. त्यामुळे उत्सुकता वाढवली गेली असतानाच दीपक यांनी दामू यांची भेट घेतल्याने भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी प्रदेश पातळीवरच प्रश्न सोडवा, असा सल्ला दिल्याचे मानले जात आहे.

Damu Naik, Deepak Dhavalikar
Goa Cabinet: कोणत्याही क्षणी होऊ शकतो नव्या मंत्र्यांचा शपथविधी? CM सावंतांनी तातडीने घेतली राज्यपालांची भेट

दोन्ही नेत्यांनी ही सदिच्छा भेट होती असे म्हटले असले तरी आताच सदिच्छेची गरज का भासली याची चर्चा सुरू झाली आहे. मांद्रे आणि प्रियोळ मतदारसंघात भाजप मेळाव्यानंतर मगोकडून अनावश्यक रीतीने प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आली. त्यामुळे वाद वाढला. प्रदेश पातळीवरील कुरबुरीवरून एकदम युती धोक्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यासाठी मगोकडून करण्यात आलेली घाईसुद्धा चुकीची होती याबाबत दामू यांनी मतप्रदर्शन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दोन्ही पक्ष युतीत असल्याने अशा भेटी होणे साहजिक असते. संघटनात्मक कामांबाबत अशा भेटींत चर्चा होते. मतदारसंघ वाटणी अशा विषयांवर अशा भेटींत चर्चा होत नाही.

दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com