कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात नवी अपडेट आली असून, मडगाव पोलिसांनी या प्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. विशा गावडे आणि सोनिया आचारी असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोन महिलांचे नाव असून, त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात आले आहे.
कांदोळी येथे समुद्रकिनाऱ्यावर परवानगी न घेता फोटोग्राफी करणाऱ्या तरुणाला पर्यटक पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे रितसर परवाना नसल्याने पर्यटन खात्याने त्याच्याकडून २५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
गोव्याने आंध्रप्रदेशच्या विरोधात 551 धावांनी विजय मिळवला आहे आणि यानंतर गोव्याच्या संघाने रणजी करंडक इतिहासात एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील जागतिक स्तरावर हा दुसरा सर्वोत्तम विजय ठरला.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत स्नेहल कवठाणकर (नाबाद 314) आणि कश्यप बखले (नाबाद 300) यांनी अरुणाचल प्रदेश विरुद्ध प्लेट डिव्हिजन क्रिकेट सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी 606 धावांच्या पार्टनरशिपसह सर्वोच्च भागीदारीचा विक्रम केला.
IMD ने 14 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर रोजी गोव्याला यलो अलर्टचा इशारा दिला आहे. दरम्यान राज्यात विजा आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) सह गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे.
आयआयटी फर्मागुडी येथे बॉम्ब ठेवल्याचे अज्ञातकडून पोलिसांना पत्र. फोंडा पोलिसांचा आयआयटी इमारतीजवळ मोठा फौजफाटा तैनात. बॉंब शोधकांना पाचरण.
अरुणाचल प्रदेश विरुद्ध पर्वरी येथे खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफी प्लेट डिव्हिजन क्रिकेट सामन्यात गोव्याच्या कश्यप बखलेने शानदार द्विशतक झळकावले आणि ही कामगिरी करणारा तो गोव्याचा आठवा फलंदाज ठरला.
गोव्याहून कर्नाटकला जाणारा ट्रक बुधवारी (दि.१३ नोव्हेंबर) रोजी रात्री मोले येथे भगवान महावीर समोरील मुख्य रस्त्यावर कलंडला, यामध्ये चालक जखमी झाला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.