PM Internship Scheme: पंतप्रधान इंटर्नशीप योजनेत उद्योगांनी सहभागी व्हावे! गोवा औद्योगिक विकास महामंडळाची विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

Prime Minister Internship Scheme Goa: उद्योगांना माहिती देण्यासाठी पणजी येथे गुरुवारी सायंकाळी उशिरा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते.
Prime Minister Internship Scheme Goa
PM Internship SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील कामाचा अनुभव मिळावा आणि त्यांची रोजगारक्षमता वाढावी, यासाठी पंतप्रधान इंटर्नशीप योजनेत अधिकाधिक उद्योगांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गोवा औद्योगिक विकास महामंडळाने केले.

या योजनेबाबत उद्योगांना माहिती देण्यासाठी पणजी येथे गुरुवारी सायंकाळी उशिरा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा गोवा औद्योगिक विकास महामंडळाने कंपनी निबंधक कार्यालय आणि उच्च शिक्षण संचालनालयाच्या सहकार्याने आयोजिली होती.

Prime Minister Internship Scheme Goa
Louis Berger Bribery Scam: लुईस बर्जर घोटाळा प्रकरणात कामत, चर्चिल यांना दिलासा; 'पीएमएलए'चा तो आदेश हायकोर्टाकडून रद्द

विविध उद्योगांतील प्रतिनिधी, शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी आणि संबंधित घटक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान इंटर्नशीप योजनेची उद्दिष्टे, पात्रता, नोंदणी प्रक्रिया, अंमलबजावणीची पद्धत तसेच उद्योगांना मिळणारे लाभ यांची सविस्तर माहिती देण्यात आली. उद्योग प्रतिनिधींना अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करण्याची संधीही देण्यात आली.

गोव्यात या योजनेसाठी उच्च शिक्षण संचालनालयाची राज्यस्तरीय समन्वय विभाग म्हणून नियुक्ती केली आहे. उद्योगांनी या योजनेत सहभागी होऊन अधिकाधिक प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमात कंपनी निबंधक तृप्ती शर्मा यांनी इंटर्नशीप ही शिक्षण आणि रोजगार यांतील महत्त्वाची कडी असल्याचे सांगितले.

Prime Minister Internship Scheme Goa
Nepal PM Oath Ceremony: नेपाळमध्ये 'बालेन' युगाचा उदय! रॅपर ते PM... बालेंद्र शाह यांनी घेतली 47 वे पंतप्रधान म्हणून शपथ

उद्योग नोंदणीविषयी मार्गदर्शन

कार्यक्रमात कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या उपसंचालक रुजुता बनकर यांनी उद्योगांच्या नोंदणी प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात उद्योग प्रतिनिधींच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. समारोपप्रसंगी उद्योगांनी युवा पिढीला घडविण्यात सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन करण्यात आले.

प्रशिक्षणार्थींना मानधन

या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना आणि युवा पदवीधरांना उद्योगांमध्ये सशुल्क प्रशिक्षणाची संधी आहे. दरमहा नऊ हजार रुपये मानधन मिळते. त्यापैकी आठ हजार १०० रुपये केंद्र सरकार तर ९०० रुपये संबंधित उद्योग देतो. याशिवाय प्रशिक्षणार्थींना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे सहा हजार रुपयांचे अनुदानही दिले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com