"निवृत्त कर्मचाऱ्याच्या 'ग्रॅच्युइटी'मधून बेकायदेशीरपणे वसूल केलेले पैसे तात्काळ परत करा!" गोवा मानवाधिकार आयोगाचा पेयजल विभागाला आदेश

Goa Human Rights Commission Gratuity Refund: आयोगाने केवळ मूळ रक्कम परत करण्याचाच नव्हे, तर त्यावर व्याजासह भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
Goa Human Rights Commission Gratuity Refund
Goa Human Rights Commission Gratuity RefundDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जवळपास तीन दशकांपूर्वी झालेल्या चुकीच्या वेतन निश्चितीचे कारण पुढे करून निवृत्त कर्मचारी साईनाथ पावसो यांच्या ‘ग्रॅच्युइटी’मधून बेकायदेशीरपणे वसूल केलेले ३ लाख ६८ हजार ७२९ रुपये परत करण्याचा आदेश गोवा मानवाधिकार आयोगाने पेयजल विभागाला दिला आहे.

आयोगाने केवळ मूळ रक्कम परत करण्याचाच नव्हे, तर त्यावर व्याजासह भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार, वसुली केलेली संपूर्ण रक्कम तक्रारदाराला १ सप्टेंबर २०२५ पासून ते प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत वार्षिक ६% व्याजासह परत करावी लागणार आहे.

Goa Human Rights Commission Gratuity Refund
Goa Electricity Bil: ग्राहकांच्या खिशाला दिलासा! अखेर 'त्या' बिलांची दुरुस्ती; अतिरिक्त शुल्क मागे घेण्याचा वीज खात्याचा मोठा निर्णय

सांगे येथील रहिवासी असलेले आणि जलपुरवठा विभागात ‘गट-क’ पदावर इलेक्ट्रिशियन म्हणून कार्यरत असलेले साईनाथ पावसो यांनी ही तक्रार दाखल केली होती. ते १९९६ पासून विभागात सेवा बजावत होते आणि ३१ ऑगस्ट २०२५ रोजी ते निवृत्त झाले. मात्र, निवृत्तीनंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांना विभागाकडून एक नोटीस बजावण्यात आली.

१९९६ मधील त्यांच्या नियुक्तीच्या वेळेपासूनच वेतन निश्चिती चुकीची झाली होती, असा दावा करत विभागाने त्यांच्या ‘ग्रॅच्युइटी’मधून ३,६८,७२९ रुपयांची ‘ज्यादा रक्कम’ कापून घेतली होती. आयोगाचे सदस्य डेस्मंड डिकॉस्टा आणि प्रमोद कामत यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

Goa Human Rights Commission Gratuity Refund
साडेसात लाख ग्राहकांचा प्रश्न! मानवाधिकार आयोगाच्या एका निर्णयाने वीज खात्याचे धाबे दणाणले; 'ॲमेकस क्युरी' ठवणार वीज बिल आणि मीटरचे भवितव्य

विभागाची ही वसुली प्रस्थापित कायद्याचे उल्लंघन करणारी असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. हा प्रकार विभागाच्या स्वतःच्या चुकीमुळे तब्बल २९ वर्षे सुरू होता, त्यात तक्रारदार कर्मचाऱ्याची कोणतीही चूक नव्हती, असे आयोगाने नमूद केले. विभागाला या आदेशाचे पालन करण्यासाठी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa bench Fire Case
Goa Human Rights Commission Water Safety
Moushumi Chatterjee Goa Event
Goa Deposit Refund Scheme
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com