Goa Illegal Fishing: पकडलेल्या 13 ट्रॉलर्सपैकी 4 पसार, पोलिसांत तक्रार; मालकांवर दंडात्मक कारवाईची तयारी

Goa Illegal Fishing Trawlers Escape: गोव्याच्या सागरी सीमेत बेकायदा मासेमारी केल्याप्रकरणी काल पकडण्यात आलेल्या १३ ट्रॉलर्सपैकी ४ ट्रॉलर्स आज पहाटे पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
Goa Illegal Fishing
Goa Illegal FishingDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी : गोव्याच्या सागरी सीमेत बेकायदा मासेमारी केल्याप्रकरणी काल पकडण्यात आलेल्या १३ ट्रॉलर्सपैकी ४ ट्रॉलर्स पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पळवून नेण्यात आलेले चारही ट्रॉलर कर्नाटकातील होन्नावर येथील असल्याची माहिती मिळाली आहे.

दक्षिण गोव्यात सीमावर्ती भागात घुसखोरी करून मासेमारी करणारे हे ट्रॉलर्स स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने पकडण्यात आले होते. त्यानंतर सर्व ट्रॉलर्स पणजी येथे आणून धक्क्यावर दोरखंडाने एकमेकांना बांधून ठेवण्यात आले. त्‍यापैकी चार ट्रॉलर्सवर मोठ्या प्रमाणात मासळीचा साठा होता. त्या मासळीचा लिलाव पुकारण्याची तयारी सुरू होती.

मात्र सकाळी मत्स्योद्योग खात्याचे कर्मचारी धक्क्यावर पोहोचले असता १३ पैकी ४ ट्रॉलर्स गायब असल्याचे निदर्शनास आले. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ट्रॉलर्सवरील मच्छीमारांनीच ते पळवून नेल्याचे समोर आले आहे.

Goa Illegal Fishing
Goa Drug Case: 'PSI'ऐवजी कॉन्स्टेबलने झडती घेतल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता, तपासातील त्रुटी ड्रग्स प्रकरणातील आरोपीच्या पथ्यावर

मत्स्योद्योग संचालक डॉ. शमिला मोंतेरो यांनी या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, पळून गेलेल्या ट्रॉलर्सची सर्व कागदपत्रे खात्याच्या ताब्यात असल्याने संबंधित मालकांना पुन्हा ट्रॉलर्स हजर करावेच लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Goa Illegal Fishing
Goa Teacher Recruitment: 760 जण 'सीबीटी-2' साठी पात्र, यादी जाहीर; 390 जणांची होणार भरती

जप्‍त केलेली मासळी फिश मिलकडे

ट्रॉलर्सवरून जप्त करण्यात आलेले पेडवे मासे खरेदी करण्यासाठी कोणताही एजंट पुढे आला नाही. त्यामुळे सरकारी नियमांनुसार त्या मासळीचे मूल्यांकन करण्यात आले असून ती मासळी आता फिश मिलकडे पाठविण्यात आली आहे. संबंधित ट्रॉलर्स मालकांकडून ठरवलेल्या मूल्याच्या पाचपट दंडाची वसुली केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant Mapusa Fish Market Visit
Colvale Goa Accident News
Bicholim Fish Market
Kapileshwari Kavale Pond Fish Death
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com