MPA Headland Sada: शिवपुतळ्यावरून संपूर्ण परिसरात हाय-अलर्ट! शांततेत आणि पूर्ण सन्मानाने पुतळा हटवण्याची प्रशासनाची तयारी पूर्ण

MPA Headland Sada Statue Remova: मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (एमपीए) हेडलँड सडा येथील वादग्रस्त पुतळा हटवण्याचा ‘मास्टर प्लॅन’ अखेर सरकारने उच्च न्यायालयात सादर केला आहे.
MPA Headland Sada Statue Remova
MPA Headland SadaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (एमपीए) हेडलँड सडा येथील वादग्रस्त पुतळा हटवण्याचा ‘मास्टर प्लॅन’ अखेर सरकारने उच्च न्यायालयात सादर केला आहे. तथापि, पुतळा हटवण्याच्या हालचालींमुळे गोव्यासह महाराष्ट्रातील शिवप्रेमी आक्रमक होण्याची शक्यता असून, पोलिस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे.

जिल्हा प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुतळा अत्यंत शांततेत व सन्मानाने हटवण्याची तयारी पूर्ण केली आहे. एकीकडे प्रशासनाने तयारी पूर्ण केली असली तरी पोलिस यंत्रणेने सरकारला सादर केलेल्या अहवालाने साऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

MPA Headland Sada Statue Remova
Old Zuari Bridge Closure: प्रवाशांनो लक्ष द्या! शनिवारी जुना झुआरी पूल राहणार बंद, नियमित तपासणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय; पर्यायी मार्गाचा करा वापर

पुतळा हटवण्याची तारीख जाहीर झाल्यास किंवा प्रत्यक्ष कारवाई सुरू होताच, महाराष्ट्र आणि गोव्यातून सुमारे २०,००० शिवप्रेमी एकाच वेळी रस्त्यावर उतरण्याची दाट शक्यता पोलिस यंत्रणांनी वर्तवली आहे. तसे सरकारच्‍या वतीने यापूर्वीच न्‍यायालयात सांगण्‍यात आले. यामुळे हा विषय अत्यंत संवेदनशील बनला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ६ जुलै २०२६ रोजी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मडगाव येथे पार पडलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीचे इतिवृत्त , मंगळवारी न्यायालयाला सादर करण्यात आले. यामध्ये पुतळा सुरक्षितपणे हटवण्यासाठीच्या विविध उपाययोजनांची आखणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

MPA Headland Sada Statue Remova
New Zuari Bridge: 'झुआरी'वरील मनोऱ्याचे काम 2031 पर्यंत पूर्ण, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती

काही दिवसांपूर्वी झालेल्‍या या बैठकीत जिल्हा प्रशासन, पोलिस आणि मुरगाव बंदर प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. तेव्‍हा सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिकेचे याचिकाकर्ते आणि त्यांच्या प्रतिनिधींनीही उपस्थित राहून प्रशासनासमोर आपली बाजू मांडली. ‘एमपीए’च्या मुख्य अभियंत्यांनी कार्यवाहीची रूपरेषा स्‍पष्‍ट केली.

पुतळा हटविण्याचा ‘मास्टर प्लॅन’ कोर्टात सादर; तारीख गुप्‍त ठेवण्याचा निर्णय २० हजार शिवप्रेमी रस्त्यावर येण्‍याची शक्यता; पोलिसांचा सरकारला अहवाल

न्‍यायालयात महत्त्वाची सुनावणी

या प्रकरणी , बुधवारी न्यायालयात होणारी सुनावणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा तिथून काढल्यानंतर नेमका कुठे ठेवला जाईल किंवा तो सुरक्षितपणे कुठे नेला जाईल, या मुख्य विषयावरच न्यायालयात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

MPA Headland Sada Statue Remova
Old Zuari Bridge Closure: प्रवाशांनो लक्ष द्या! शनिवारी जुना झुआरी पूल राहणार बंद, नियमित तपासणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय; पर्यायी मार्गाचा करा वापर

अशी आहे तयारी

  न्यायालयाने कोणतीही स्थगिती न दिल्यास या महिन्यात पुतळा, चबुतरा हटणे शक्‍य.

  पुतळा हटवण्याची नेमकी तारीख, वेळ केवळ ‘एमपीए’ प्रशासनाला कळवली जाईल.

  लोकांची गर्दी जमा होऊ नये म्हणून ही तारीख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.

  सर्व मनुष्यबळ, यंत्रसामग्री, पायाभूत सुविधा ‘एमपीए’ सज्ज ठेवणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com