
कळंगुट: सरकारने राज्यातील पर्यटक टॅक्सीचालकांवर ॲप ॲग्रिगेटर जबरदस्तीने लादू नये. मात्र, या व्यवसायात डिजिटल पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केले.
कळंगुट येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी खासगी टॅक्सी, रेंट -अ- कार व कॅब टॅक्सी सेवेमुळे राज्यात अपघात वाढल्याचे सांगून यापुढे अशा वाहनांना परवाना न देण्याचे आवाहन केले होते.
तसेच वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्थानिक टॅक्सीचालकांमुळे राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटल्याच्या विधानांचा लोबो यांनी खरपूस समाचार घेतला. राज्यातील पर्यटक संख्या स्थानिक टॅक्सीचालकांमुळे घटली नसून येथील बेशिस्त व्यवस्था तसेच किनाऱ्यावरील अस्वच्छता हे घटक कारणीभूत आहेत.
मी कचरा व्यवस्थापन मंत्री असताना बायोमेडिकल तसेच सागरी किनाऱ्यावरील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक पंचायतींना कार्यरत केले होते; परंतु आता असे होताना दिसत नाही. त्यामुळे किनाऱ्यांवर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे आमदार लोबो यांनी सांगितले.
मी स्वतः पर्यटन क्षेत्रातील अनेकांपैकी एक लाभधारक असून राज्यातील पर्यटन व्यवसाय ही गोष्ट मंत्री माविन गुदिन्हो यांना माहीत नाही. सरकारातील मंत्री- आमदारांनी स्थानिक टॅक्सीचालकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आपापसांत विरोध- मतभेद न करता एकत्रित बसून निर्णय घेण्याचे आवाहन आमदार मायकल लोबो यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.