Goa Education: आजचे विद्यार्थी उद्याच्या भारताचे शिल्पकार! त्यामुळे 8वी पासून कौशल्य विकासचा अभ्यासक्रमात समावेश; CM सावंत

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री म्हणाले, सरकार खेळ आणि शिक्षण क्षेत्रात नव्या पिढीला घडवण्यावर भर देत असून राज्यभरात सरकारी जमिनीवर मैदाने विकसित केली जात आहेत.
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Goa: आजचे विद्यार्थी उद्याच्या भारताचे शिल्पकार आहेत. या मुलांनी फिटनेस आणि कौशल्य दोन्ही अंगी बाणवले पाहिजे. त्यामुळे सरकारने ८वी, ९वी, १०वीपासूनच कौशल्य विकास विषय अभ्यासक्रमातच समावेश केला आहे, असे उद्‍गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुंभारजुवे येथे काढले

कुंभारजुवेतील फिलोमीना डिसा मैदानाच्या पुनर्बांधणी व व्यायामशाळेसह इनडोअर सभागृहाच्या बांधकाम प्रकल्‍पाचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी कुंभारजुव्याचे आमदार आणि गोवा पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष राजेश फळदेसाई, प्रियोळचे आमदार आणि माजी क्रीडामंत्री गोविंद गावडे, सरपंच सचिन गावडे, उपसरपंच सुधीर फडते तसेच पंच सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.राज्यातील युवकांचे फिटनेस आणि कौशल्य विकास यावर भर देत

मुख्यमंत्री म्हणाले, सरकार खेळ आणि शिक्षण क्षेत्रात नव्या पिढीला घडवण्यावर भर देत असून राज्यभरात सरकारी जमिनीवर मैदाने विकसित केली जात आहेत. कुंभारजुव्यासारख्या ठिकाणी दर्जेदार क्रीडा सुविधा उभी राहणे ही आनंदाची बाब आहे. आमदार राजेश सर्वच कामांचे सातत्याने पाठपुरावा करतात. मोठी किंवा लहान कामे असोत, ते पूर्ण करण्याची त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी आहे.आगामी गणेश चतुर्थीपर्यंत हे मैदान तयार करण्याचा मानसही मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.

CM Pramod Sawant
Goa Schools Exams: शालेय परीक्षांबाबत मोठी अपडेट! 2 सत्रांमध्ये होणार आयोजन; प्रश्‍नपत्रिका, वेळापत्रक ‘जीएसईआरटी’द्वारे

विकासकामांची यादी सादर

फळदेसाई म्हणाले, गवंडाळी रस्त्याच्या कामानंतर कुंभारजुवे पुलाचे पुनर्बांधणी काम हाती घेतले जाईल. सध्या तो पोर्तुगीज काळातील असून खराब अवस्थेत आहे. त्याआधी १० मीटर रुंदीचा पर्यायी रस्ता बांधला जाईल. तसेच सांतइस्तेव पुलाच्या २१ कोटी रुपयांच्या प्रकल्पालाही मंजुरी मिळाली आहे. दिवाडी मैदानासाठी २.७२ कोटी रुपये, गवंडाळी उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वाकडे झेपावत आहे, करमळी तलावाच्या विकासासह जुनेगोवे पोलिस स्थानक, कृषी सेतू योजना, अशा विविध कामे मार्गी लागत आहेत.

CM Pramod Sawant
Goa Exam: आधारकार्ड तपासले आणि सापडले बोगस परीक्षार्थी! NIO परीक्षेत ‘डमी’ उमेदवार; दोघांना अटक

रणजी सामने होऊ शकतील!

आमदार फळदेसाई म्हणाले, या मैदानावरील प्रकल्प हे माझे पूर्वीपासूनचे स्वप्न होते. मी आमदार होण्यापूर्वीच हे वचन दिले होते आणि सातत्याने पाठपुरावा करून आज हे शक्य झाले आहे. याच मैदानावर अनेक स्पर्धा भरतात. गोवा व इतर राज्यातील खेळाडू येथे खेळले आहेत. आता आम्हांला दर्जेदार सुविधांचा लाभ मिळणार आहे. या इनडोअर हॉलमध्ये ३ टेबल टेनिस कोर्ट, व्यायामशाळा आणि चेंजिंग रूम्स असतील. १ हजार जणांची क्षमता असलेले सभागृहही असेल. इतक्या दर्जाचे मैदान होणार आहे की, रणजी सामनेही आयोजित करता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com