Goa Government: नियमांची अंमलबजावणी मंत्र्यांपासूनच सुरु व्हावी!

Goa Government: वाहतूक नियम आणि शिस्त प्रत्येकाने पाळली तरच अपघात आणि मृत्युंचे प्रमाण कमी होऊ शकते.
Goa Government
Goa GovernmentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government: वाहतूक नियम आणि शिस्त प्रत्येकाने पाळली तरच अपघात आणि मृत्युंचे प्रमाण कमी होऊ शकते. याची सुरुवात प्रथम मंत्री आणि अतिमहनीय व्यक्तींपासून झाली पाहिजे, अशा रोखठोक सूचना जनसुनावणीवेळी करण्यात आल्या. यावेळी वाहतूक सुरक्षा व्यवस्थापन आराखडा 15 दिवसांत तयार केला जाईल आणि 1 डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी सुरु होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

रस्ते सुरक्षा व्यवस्थापन आराखडा जनसुनावणीचे उदघाटन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, पोलिस महासंचालक जसपाल सिंग, वाहतूक संचालक राजन सातार्डेकर आणि मान्यवर उपस्थित होते. बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यास पोलिसांना स्वातंत्र्य दिले पाहिजे.

Goa Government
Goa News: गोव्यात खाणीच्या पाण्यातून वीजनिर्मिती- सुदिन ढवळीकर

मृत्युला कारणीभूत ठरलेले वाहन कायमचे जप्त केले पाहिजे. रस्ते वाहतूक सुरक्षा हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा. जेणेकरून लहान वयातच मुलांना योग्य-अयोग्याची जाण येईल. वाहतूक नियम पाळण्याची सक्ती मुलेच पालकांना करतील. कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, असा सूर या जनसुनावणीत व्यक्त झाला.

स्वयंअपघात चिंताजनक

रस्ता वाहतूक व्यवस्थापन विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबत शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला घेऊ. गेल्या 9 महिन्यांत 135 गंभीर अपघात झाले, ज्यात जीवितहानी झाली. त्यातील 50 टक्के अपघात हे स्वयंअपघात आहेत. त्यात दुसऱ्या वाहनाचा समावेश नाही. हे स्वयंअपघात का होतात, याची कारणे शोधून तोडगा काढणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Goa Government
Goa Government: कामगारांच्या किमान वेतनात लवकरच सुधारणा केली जाईल; बाबूश मोन्सेरात

उपस्थित नागरिकांच्या लक्षवेधी सूचना अशा...

  • पोलिस आणि आरटीओने लाच घेणे बंद करावे.

  • राज्यातील सर्व रस्ते कॉंक्रिटचे हवेत.

  • डांबरी रस्त्यांवर खड्डे पडतात, ते लगेच बुजविण्याची जबाबदारी कंत्राटदारावर सोपवली पाहिजे.

  • भारतीय रस्त्यांना पूरक अशाच वाहनांचे मॉडेल असायला हवे.

  • दुचाकीचालक आणि स्वार दोघांनाही हेल्मेट सक्ती असावी.

  • मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यावर कडक कारवाई करून त्याचे वाहन कायमचे जप्त करावे.

  • वाहनाचे टायर गुळगुळीत झाले, तरी वापरले जातात. त्यावर बंदी असावी.

  • वाहनांचे मागचे दिवे पेटत नसतील तर त्यांची तपासणी व्हावी.

  • वाहनांच्या पुढच्या दिव्यांवर काळा ठिपका असावा.

  •  मोकाट गुरे आणि श्‍वानांचा बंदोबस्त करणे आवश्‍यक.

  •  रस्ते वाहतूक सुरक्षा शालेय शिक्षणाचा भाग असावा.

Goa Government
Goa Politics: कुंकळ्ळीचे नगरसेवक उद्देश नाईक देसाई यांची गोवा फॉरवर्डमधून हकालपट्टी!

सरकार योग्य तेच जनतेला देणार: कोणीही, कितीही विरोध केला तरी भाजप सरकार जनतेला योग्य तेच देणार आहे. विरोध करणाऱ्यांचा नेहमी विरोधासाठी विरोध असतो. त्याला हे सरकार घाबरत नाही. ॲप आधारित टॅक्सी सेवा, गोवा माईल्स, मोपा विमानतळ आदींचा उल्लेख करून सर्व प्रश्र्न सोडवण्यास सावंत सरकार समर्थ असल्याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com