Goa News: गोव्यात खाणीच्या पाण्यातून वीजनिर्मिती- सुदिन ढवळीकर

Goa News: बेतोडा-फोंडा येथे भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पास प्रारंभ करण्यात आला.
 Goa News | Sudin Dhavalikar
Goa News | Sudin Dhavalikar Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: राज्यातील खनिज खाणींच्या खंदकात साठलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून वीजनिर्मितीचा प्रकल्प राज्य सरकार हाती घेणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील वीजटंचाई दूर होईल, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. इतर राज्यांपेक्षा गोव्यात विजेचा पुरेसा पुरवठा होत असून त्यात सातत्याने सुधारणा करण्यात येत असल्याची ग्वाहीही ढवळीकर यांनी दिली.

शिरोडा मतदारसंघातील भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामास बेतोडा येथून प्रारंभ करण्यात आला. यावेळी वीजमंत्री सुदिन ढवळीकर बोलत होते. यावेळी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, स्थानिक सरपंच, पंचसदस्य आणि वीज खात्याचे अधिकारी उपस्थित होते. ढवळीकर म्हणाले की, खाणींच्या पाण्यावरील वीजनिर्मिती प्रकल्पाला केंद्र सरकारनेही हिरवा कंदील दाखवला आहे.

 Goa News | Sudin Dhavalikar
Indian Super League: एफसी गोवाच्या विजयाचा शिल्पकार ठरला नोह सादौई!

बेतोडा तसेच इतर ठिकाणची विजेची कामे हाती घेण्यात येत असून प्रत्येक मतदारसंघात किमान 40 कोटींची कामे होणार आहेत. शिरोडा मतदारसंघाला 24 तास पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्या खात्यामार्फत राज्यातील लोकांना चांगले ते देण्याचा सातत्याने प्रयत्न राहील, अशी ग्वाही मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. स्वागत व प्रास्ताविक वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले.

वीज खात्याची प्रगती समाधानकारक

राज्यातील वीज खात्याची प्रगती समाधानकारक असून गेल्या सहा महिन्यांत 40 टक्के महसूल वाढला आहे. ग्राहकांच्या वीज पुरवठ्यात सातत्य ठेवताना औद्योगिक आस्थापनांनाही पुरेसा पुरवठा करण्यात येत आहे. केंद्राच्या माध्यमातून सोलर एनर्जीसाठी प्रयत्न करण्यात येत असून औद्योगिक वसाहतीतील विविध प्रकल्पही त्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे वीज खात्याला मोठा दिलासा मिळाला आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.

 Goa News | Sudin Dhavalikar
Goa Taxi: दाबोळी विमानतळावर टॅक्सी चालकांची काउंटरची मागणी अमान्य; राज्य सरकारची भूमिका

... अन्यथा प्रकल्प खर्चिक

आडवे आणि उभे जलविद्युत प्रकल्प उभारता येतात. सध्या नव्या तंत्रज्ञानाचे छोट्या क्षमतेचे प्रकल्पही बसवले जातात. मात्र, त्यासाठी पाणी साठे हे उंचीवर असणे गरजेचे आहे. भूगर्भात खोलवर असलेल्या पाणी साठ्यातून अशा प्रकारची वीजनिर्मिती करता येत नाही.

पंपांच्या साह्याने पाणी उपसा करून त्यावर जलविद्युत प्रकल्प उभारल्यास खर्च दुप्पट होतो. त्यामुळे असे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या हितावह आणि व्यवहारी नसतात, असेही खोचीकर म्हणाले.

प्रत्‍यक्षात हे शक्‍य आहे का?

कोणत्याही प्रकारचे जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी उंचीवरील उच्च दाबाचे जलस्रोत गरजेचे असतात. जितका मोठा आणि उच्च दाबाचा जलस्रोत तितक्या मेगावॅट विजेची निर्मिती होते. खाणीतील पाण्याच्या आधारे वीजनिर्मिती आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसेल.

जलविद्युत प्रकल्पांसाठी नैसर्गिकदृष्ट्या पाणी साठे हे उंचीवर असणे गरजेचे आहे, असे जलविद्युत प्रकल्पातील तज्ज्ञ अभय खोचीकर यांनी सांगितले.

 Goa News | Sudin Dhavalikar
Mapusa Municipal Council: 'संपाबाबतचा निर्णय 31 ऑक्टोबरनंतरच'

टीका करा; पण सकारात्मक

राज्याच्या विकासासाठी सकारात्मक विचारसरणीची आवश्‍यकता असून टीका जरूर करा; पण ती सकारात्मक असावी, नकारात्मक नव्हे, असे ढवळीकर म्हणाले. वीजमंत्री या नात्याने संपूर्ण गोव्यासाठी विजेच्या विविध सुविधा आणि उपक्रम राबवण्यासाठी बांधील असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com