बांबोळी: बांबोळी येथे असलेले एटीएम अज्ञातांनी फोडले असुन, हे एटीम नेक्सा शोरूमशेजारी हे होते. मात्र, त्यांना चोरी करणे शक्य झाले नाही. रविवारी रात्री ही घटना घडली. राज्यात चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी फोंड्यात एटीएम फोडण्याची घटना घडली होती.
(Unknown persons broke ATM in Bambolim Further investigation continues)
ATM फोडता न आल्यामुळे चोरट्यांनी 2 एटीएम मशीन लांबवली
फोंडा तालुक्यात एकाच रात्री एक-दोन नाही तर तब्बल तीन चोऱ्या झाल्याने खळबळ उडाली होती. चोरट्यांनी खांडोळ्यातील एक मंदिर लुटलं. यासोबतच म्हार्दोळ परिसरातही एका दुकानावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला होता. तर उसगाव तिस्क परिसरातील दोन एटीएम चोरट्यांनी फोडता न आल्यामुळे पळवल्याची घटना उघडकीस आली होती.
दरम्यान, तिस्क - उसगाव येथे झाली असून चोरट्यांनी एचडीएफसी आणि कॅनरा बँक अशा दोन बँकांची एटीएम रात्री पळवली होती. चोरट्यांनी जवळच असलेल्या कुळण येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी ही एटीएम फोडली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.