Goa Government: गोवा सरकारचे '20' हजार नोकऱ्यांचे ध्‍येय!

Goa Government: देश-विदेशातील अधिकाधिक गुंतवणूकदारांना गोव्यात आणून गुंतवणूक करण्याचा प्रयत्न आहे.
Ralph D Souza | Goa Government
Ralph D Souza | Goa GovernmentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government: गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (Goa Chamber Of Commerce And Industry), एफआयसीसीआय व गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 6 व 7 ऑक्टोबरला ताळगाव कम्युनिटी सेंटरमध्ये ‘इन्‍व्हेस्ट गोवा:22’ परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्‍घाटन आज संध्याकाळी 4.30 वाजता मुख्‍यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्‍या हस्‍ते होईल.

देश-विदेशातील अधिकाधिक गुंतवणूकदारांना गोव्यात आणून सुमारे 20 हजार रोजगार व 10 ते 15 हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती जीसीसीआयचे अध्यक्ष राल्फ डिसोझा यांनी दिली.

Ralph D Souza | Goa Government
Goa Traditional Utsav: रवळनाथ देवस्थानात अवसर उत्सव सुरु

जीसीसीआय कार्यालय सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत डिसोझा बोलत होते. यावेळी उपाध्यक्षा प्रतिमा धोंड, माजी अध्यक्ष व प्रोजेक्ट संचालक मांगिरीश पै रायकर, संचालक संजय आमोणकर हेही उपस्थित होते.

गोव्यात लॉजिस्टिक हब व हॉस्पिटॅलिटीसाठी संधी असल्याने गुंतवणूकदारांना गोव्यात गुंतवणूक करण्यासाठी सर्व त्या सुविधा पुरविण्यात येतील. याबाबत जीसीसीआयने देशातील विविध राज्यांमध्ये रोड शो केलेले आहेत.

Ralph D Souza | Goa Government
Goa RSS: साखळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दसरा संचलन उत्साहात साजरा!

आतापर्यंत 15 गुंतवणूकदार त्‍यासाठी तयार झालेले आहेत. 2008 साली पर्यटन परिषद तर 2012 साली उद्योग परिषद यशस्वी ठरली होती. या परिषदेवेळी उपस्थित गुंतवणूकदारांच्‍या शंकांचे निरसन तसेच त्‍यांच्‍याशी चर्चात्‍मक कार्यक्रम होईल, अशी माहिती डिसोझा यांनी दिली.

ही परिषद राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरणार आहे. तसेच राज्यात सुरू होणाऱ्या नव्या उद्योगांच्‍या भरभराटीसाठी फायदेशीर ठरणार आहे. ट्रेड हबसाठी भारत सरकारने काही विदेशी कंपन्यांबरोबर करारही केला आहे, अशी माहिती उपाध्यक्ष प्रतिमा धोंड यांनी दिली.

Ralph D Souza | Goa Government
Goa Municipality: म्हापसात प्रतीक्षा नवीन 'CCTV' कॅमेऱ्यांची!

200 प्रतिनिधींची नोंदणी

देशातील विविध सीसीआयबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गोव्यात गुंतवणूक करण्याबाबत चर्चा झालेली आहे. राज्यातील बिट्‌स पिलानी, आयआयटी, एनआयटी, जीईसी यांच्याशीही संपर्क झालाय. हॉस्पिटॅलिटी व इंटरटेन्मेंट पार्क या क्षेत्रातून सुमारे 7 हजार जणांना रोजगार मिळू शकतो.

परिषदेला देश-विदेशातून 200 प्रतिनिधींची नोंदणी झाली असून, सुमारे 30 ते 40 टक्के गुंतवणूक करणारे तर इतर गुंतवणुकीबाबत विचार करणारे आहेत, असे मांगिरीश पै रायकर म्हणाले.

Ralph D Souza | Goa Government
Goa Program: कार्यक्रम मंदिराचा, अन् चर्चा मात्र आयआयटीची!

राल्‍फ डिसोझा, जीसीसीआयचे अध्यक्ष-

गोव्यात लॉजिस्टिक हब व हॉस्पिटॅलिटीसाठी संधी असल्याने गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी सर्व त्या सुविधा पुरविण्यात येतील. याबाबत जीसीसीआयने देशातील विविध राज्यांमध्ये रोड शो केलेले आहेत. आतापर्यंत 15 गुंतवणूकदार तयार झालेले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com