Goa Municipality: म्हापसात प्रतीक्षा नवीन 'CCTV' कॅमेऱ्यांची!

Goa Municipality: सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
CCTV Camera | Goa Municipality
CCTV Camera | Goa MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Municipality: एकीकडे वाढते गुन्हे ही चिंतेची बाब असताना, म्हापसा शहारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची समस्‍या त्‍यात आणखी भर टाकत आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तरीसुद्धा म्हापसा नगरपालिकेने येथील जुने सीसीटीव्‍ही कॅमेरे दुरुस्त केलेले नाहीत किंवा नवीन कॅमेरे बसविण्यासाठी पावले उचललेली नाहीत.

मिळालेल्‍या माहितीनुसार, यापूर्वी म्‍हापसा शहरात विविध ठिकाणी 16 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. मात्र, देखभालीअभावी हे सर्व कॅमेरे बंद पडले. यासंदर्भात म्हापसा पालिकेने अनेकदा ठराव घेतले, मात्र विविध तांत्रिक कारणांमुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

CCTV Camera | Goa Municipality
Goa Fish Market: गोव्यात सुकी मासळीही खातेय भाव; गोवेकरांची प्रचंड मागणी!

परिणामी पोलिसांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशावेळी गुन्हे घडल्यास पोलिसांना देखील बहुतांशवेळी तपासाकार्यात घरे किंवा आस्थापनांच्या सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून रहावे लागते. दरम्यान, नुकताच एका शाळेतून पाचवीतील मुलीच्या कथित अपहरणाच्या अयशस्वी प्रयत्नानंतर पालकांत घबराट निर्माण झाली आहे.

CCTV Camera | Goa Municipality
Goa Program: कार्यक्रम मंदिराचा, अन् चर्चा मात्र आयआयटीची!

कॅमेरे बसविण्‍यासाठी प्रयत्‍नशील: नगराध्‍यक्ष

याबाबत म्हापसा नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांनी सांगितले की, आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा ठराव पालिका बैठकीत घेतला होता. त्यानुसार पालिका प्रशासन संचालकांकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मात्र तो माघारी पाठविण्यात आला. आर्थिक अडचणींमुळे हा प्रस्ताव प्रत्यक्षात येऊ शकला नाही. तो मार्गी लागवण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com